भोसरी, दिघी, मोशीत अनधिकृत बांधकामे पाडली
esakal April 12, 2026 10:45 PM

पिंपरी, ता. १२ : भोसरीतील चक्रपाणी वसाहत आणि दिघी रेडझोन परिसरातील नऊ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने रविवारी कारवाई केली. सुमारे दहा हजार चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रावरील पक्की बांधकामे पाडण्यात आली. तसेच, मोशीतील इंद्रायणी नदी पूररेषा, मोशी टोलनाका परिसर व लक्ष्मीनगरमधील नाल्यालगतची १४ हजारांपेक्षा अधिक चौरस क्षेत्रफळावरील ११ अनधिकृत पत्राशेड व बांधकामांवरही कारवाई केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.