नऊ वर्षीय वीराच्या पुस्तकाचे प्रकाशन
विरार (बातमीदार) : वेलवेट पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्था यांच्या पुढाकारातून ४४ लेखकांची ५० पुस्तके एकाच वेळी प्रकाशित करून अनोखा जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यात आला. या उल्लेखनीय उपक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्डस् तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये करण्यात आली आहे. या कार्यक्रमात वसईच्या अवघ्या नऊ वर्षीय वीरा दर्शित चौधरी हिच्या ‘वीराच्या गोष्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी लेखिका रोहिणी निनावे, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद असलेल्या गायिका मंजुश्री ओक, पत्रकार-समीक्षक सौमित्र पोटे तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसचे प्रतिनिधी अशोक आदक उपस्थित होते.