भारतीय हवामान खात्याने आज मान्सूनबाबतचा पहिला अंदाज वर्तवला
२०२६ मध्ये ९२ टक्के पावसाचा अंदाज
देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता
महाराष्ट्रातही पाऊस कमी पडणार
देशातील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. यावर्षी देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांचे टेन्शन वाढलं आहे. हवामान विभागाने आज नैऋत्य मान्सून २०२६ चा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये ९२ टक्के पाऊस पडू शकतो. म्हणजेच यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, यंदा देशामध्ये सरासरीपेक्षा ९२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जेव्हा हवामान विभाग ९० ते ९५ टक्के पावसाचा अंदाज वर्तवतो तेव्हा देशात पाऊस कमी पडण्याचा अंदाज असतो. यावर्षी ९२ टक्के पाऊसाचा अंदाज आहे म्हणजे पाऊस कमी पडणार आहे. यावर्षी मान्सूनवर एल नीनोचा प्रभाव दिसू शकतो. त्यामुळे पाऊस कमी पडू शकतो आणि तीव्र उष्णता जाणवू शकते.
Pune Rain: पुण्यात अवकाळीचा हाहाकार! रस्त्यांना नदीचे स्वरूप, वाहनं पाण्यात बुडाली; पाहा थरकाप उडवणारा VIDEOएप्रिल ते जून या कालावधीमध्ये एल नीनो-दक्षिणी दोलन तटस्थ स्थितीत राहण्याची शक्यता आहे. जूननंतर मान्सूनहंगामामध्ये अल नीनोची तीव्र स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जूननंतर मान्सून काहीसा कमकुवत राहू शकतो. यामुळे देशात पाऊस कमी पडू शकतो. एप्रिल ते जून या कालावधीत परिस्थिती सामान्य राहील. पण त्यानंतर मान्सूनदरम्यान अल नीनो सक्रिय होण्याची शक्यता आहे.
Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरलहवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात देखील सामान्यापेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ याठिकाणी सामान्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी चिंतेत आला आहे. तर ईशान्य भारत, उत्तर-पश्चिम भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भागांमध्ये यंदा सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महत्वाचे म्हणजे दक्षिण-पश्चिम मान्सूनसाठी यंदा अनुकूल परिस्थिती असून मान्सून वेळेवर दाखल होण्याची शक्यता आहे.
Snake Rain: उत्तर भारतात सापांचा पाऊस? आकाशातून साप पडल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत