पुणे: वाघोली परिसरातील भावडी गावात गावठी दारूच्या हातभट्टीवर गुन्हे शाखेतील युनिट सातच्या पथकाने छापा टाकून गावठी दारू आणि रसायन असा दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला. त्यानंतर पोलिसांकडून जेसीबीच्या साहाय्याने ही हातभट्टी उद्ध्वस्त करण्यात आली.
Secondary Education: माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय! ३८२ शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार रोखणार; नेमकं काय कारण?या प्रकरणी आरोपीविरुद्ध वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट सातचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या सूचनेनुसार, पोलिसांचे पथक अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईसाठी वाघोली परिसरात गस्त घालत होते. भावडी गावातील हंडगर वस्तीजवळ एकजण गावठी दारू तयार करत असल्याची माहिती पोलिस अंमलदार ऋषीकेश ताकवणे यांना मिळाली.
या माहितीची खातरजमा केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळावरून साडेपाच हजार लिटर कच्चे रसायन जप्त करून नष्ट केले. तसेच, पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने हातभट्टीची जागा उद्ध्वस्त केली.
MPSC Success Story: वडिलांच्या निधनाचे दु:ख बाजूला सारून गाठले यशाचे शिखर; विक्रम पाडळेची कर सहाय्यकपदी निवड, अंत्यविधी दिवशीच एमपीएससीची परीक्षा!पोलिस पसार झालेल्या आरोपीचा शोध घेत आहेत. ही कारवाई पोलिस उपायुक्त विवेक मासाळ, सहाय्यक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे, सहाय्यक निरीक्षक मदन कांबळे यांच्या पथकाने केली.