-मंगरूळ नवघरे
चिखली : कर्तव्यावर असताना झालेल्या भीषण अपघातात चिखली पथकातील होमगार्ड जवान आत्माराम उत्तमराव वखरे (वय ५७), रा. सवना यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना (ता.१३) घडली. या घटनेमुळे चिखली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Secondary Education: माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय! ३८२ शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार रोखणार; नेमकं काय कारण?प्राप्त माहितीनुसार, आत्माराम वखरे हे दुपारी सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास कार्यालयीन ड्युटीवर होते. कामकाज आटोपून ते बुलडाणा जिल्हा पोलीस कार्यालयात डाक देण्यासाठी एमएच २८ जेबी १४७१ क्रमाकाच्या दुचाकीने जात होते. त्यांच्या सोबत किरण तुकाराम मोरे(वय ५०) हेही दुचाकीवर होते.
दरम्यान, बुलडाणा नजिक केळवद येथील हॉटेल गुलमोहरसमोर त्यांच्या दुचाकीला बोलेरो पिकअप एमएच २८ बीबी ७३६० या वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आत्माराम वखरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर किरण मोरे हे किरकोळ जखमी झाले आहेत.
Maratha Coins Discovery: मराठाकालीन दुर्मीळ नाणी सापडली; संगमनेर तालुक्यातील निमगावजाळीत ऐतिहासिक ठेवा, ‘छत्रपती’ असा उल्लेख..कर्तव्यावर असतानाच त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक अमोल गायकवाड, चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे तसेच तालुका होमगार्ड समादेशक शिवसिंग साळोख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, वाहनचालकाविरुद्ध चिखली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, पत्नी व आई असा परिवार आहे.