सचिन कदम, साम टीव्ही
रायगड: निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या एका तरुण पर्यटकाचा रायगडमधील प्रसिद्ध इर्शाळगडावर दरीत पडून मृत्यू झाला आकाश वाघमोडे (वय 26, रा. भिवंडी) असे या मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी सोलो ट्रेकिंगसाठी गेलेला आकाश बेपत्ता झाल्यानंतर सोमवारी त्याचे पार्थिव दरीत सापडले.
Nashik Crime: नाशिक हादरले! दिवसाढवळ्या महिलेकडून तरुणाची हत्या, आधी दगडाने ठेचलं नंतर कोयत्याने सपासप वार; थरकाप उडवणारा VIDEOमिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी येथील आकाश वाघमोडे हा तरुण काल खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथील इर्शाळगडावर एकटाच ट्रेकिंगकरण्यासाठी आला होता. गडावर चढत असताना त्याचा पाय घसरला किंवा इतर कोणत्यातरी कारणाने त्याचा तोल जाऊन तो थेट खोल दरीत कोसळला.
Jalna: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरी तुमरीआकाश घरी न परतल्यामुळे आणि त्याचा संपर्क होऊ न शकल्यामुळे शोध सुरू करण्यात आला. त्याची मोटारसायकल इर्शाळगडाच्या पायथ्याशी पार्क केलेली आढळल्याने तो गडावरच असल्याची खात्री झाली. त्यानंतर खालापुर पोलीस आणि खोपोली हेल्प फाऊंडेशनच्या पथकाने आज सकाळी तातडीने शोधकार्य हाती घेतले.
Aditya Thackeray News | भर मंचावरुन आदित्य ठाकरे यांनी Cm Eknath Shinde यांची ॲक्टींग केलीअत्यंत अवघड असलेल्या इर्शाळगडाच्या दरीमध्ये शोध घेत असताना मदत पथकाला आकाशचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून अधिक तपास करत आहे. एका उमद्या तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने भिवंडी परिसरात आणि ट्रेकर्समध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.