रस्ते दुरुस्ती संदर्भात महापौरांकडे मागणी
esakal April 13, 2026 10:45 PM

रस्ते दुरुस्तीसंदर्भात महापौरांकडे मागणी

विरार, ता. १३ (बातमीदार) : नायगाव पूर्वेकडील टीवरी फाटा (वामन धाबा) ते भोईदापाडा रस्त्याचे आणि गटाराचे भूमिपूजन रविवारी (ता. १२) महापौर अजीव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होत. त्या वेळी येथील नागरिकांनी मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली ऑरनेट गॅलॅक्सि ते स्टार सिटी दरम्यानच्या रस्ते दुरुस्ती काम करण्याची मागणी महापौरांकडे केली.
याबाबतचे निवेदन महापौर अजीव पाटील यांना देण्यात आले. या वेळी महापौरांनी सदर रस्त्याची पाहणी केली व येत्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हा विषय घेऊन या रस्त्याच्या कामाच्या दुरुस्तीला मंजूर देण्यात येईल, असे आश्वासन महापौर अजीव पाटील यांनी दिले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.