डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे उद्घाटन
घाटकोपर, ता. १३ (बातमीदार) ः टागोर नगर येथील मातृछाया सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता. १२) दिवंगत प. म. राऊत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे उद्घाटन स्थानिक नगरसेविका सुनिता जाधव यांच्या हस्ते पार पडले. या वेळी डॉ. विनय राऊत, विनोद कांबळे आणि उदय कुलकर्णी उपस्थित होते. या वेळी बालसंस्कार उपक्रम, खेळ, पेंटिंग तसेच जादूच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.