प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी त्यांच्या कारकिर्दीत भारतीय संगीतकारांसोबतच आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबतही काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर संपूर्ण भारतभरच नाही तर जगभर शोककळा पसरली आहे. आशा भोसले यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत असताना ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध वेगवान गोलंदाज ब्रेट ली याच्यासोबतही गाण गायलं आहे. त्यांच्या निधनानंतर त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे.
2007 मध्ये आलेल्या ‘आशा अँड फ्रेंड्स’ या अल्बममध्ये हे गाणं होतं आणि त्या काळात ते खूप लोकप्रिय झालं होतं.
आशा भोसले या हिंदी चित्रपटसृष्टीतील एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व होत्या, ज्यांचा स्वर अनेक पिढ्यांच्या स्मृतीत चिरंतन कोरला गेला आहे. त्यांच्या निधनानंतर संगीतक्षेत्रात प्रचंड रिक्तता निर्माण झाली असून, संपूर्ण देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे.
सुमारे आठ दशकांच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी 20 हून अधिक भाषांमध्ये 12,000 पेक्षा जास्त गाणी रेकॉर्ड केली. या अद्वितीय प्रवासात त्यांनी अनेक दिग्गज गायक आणि संगीतकारांसोबत काम केलं. त्यापैकी विशेष लक्ष वेधून घेणारं काम म्हणजे ब्रेट ली यांच्यासोबत केलेलं गाणं होय.
Asha Bhosle’s Final Song : “या प्रवासाच्या शेवटी मी एक स्वर बनेन…” आशा ताईंंच शेवटचं गाणं चर्चेत, Viral Video ब्रेट ली यांनी हिंदीत गायलेलं गाणं‘आशा अँड फ्रेंड्स’ या अल्बममधील ‘हां मैं तुम्हारा हूं’ हे गाणं आशा भोसले आणि ब्रेट ली यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं होतं. या गाण्यात ब्रेट लीने हिंदीतही गाणं गायलं होतं, जे त्या काळात खूप गाजलं होतं. भारताबद्दल असलेलं त्याचं प्रेम त्यांनी अनेकदा व्यक्त केलं असून, या गाण्यातून ते अधिक ठळकपणे दिसून येतं.
ब्रेट लीने आपल्या आत्मचरित्र ‘माय लाइफ : ब्रेट ली’ मध्ये या अनुभवाबद्दल सविस्तर उल्लेख केला आहे. त्याने सांगितलं की, आशा भोसले यांच्यासोबत काम करणं ही त्याच्या आयुष्यातील अत्यंत अविस्मरणीय संधी होती. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2007 दरम्यान त्याची आशा ताईंसोबत पहिली भेट झाली होती.
Asha Bhosle’s Final Song : “या प्रवासाच्या शेवटी मी एक स्वर बनेन…” आशा ताईंंच शेवटचं गाणं चर्चेत, Viral Videoत्या भेटीत आशा भोसले यांनी त्याच्याशी या विशेष संगीत प्रकल्पाबद्दल चर्चा केली आणि त्याने क्षणाचाही विलंब न करता तत्काळ होकार दिला. ब्रेट लीच्या म्हणण्यानुसार, इतक्या महान गायिकेसोबत काम करण्याची संधी मिळणं हे त्याच्यासाठी जणू एखादं स्वप्न साकार झाल्यासारखं होतं.