Who is leading Orange Cap IPL 2026 after RCB vs LSG? रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये बुधवारी लखनौ सुपर जायंट्सवर ५ विकेट्स व २९ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. LSG चे १४६ धावांचे लक्ष्य RCB ने १५.१ षटकांत ५ बाद १४९ धावा करून पार केले. एम चिन्नास्वामी स्टेडियमवरील RCB चा सलग पाचवा विजय ठरला. त्यांनी यापूर्वी २०११-१२ व २०१३ मध्ये सलग सहा सामने इथे जिंकले होते. २९ चेंडू राखून झालेला पराभव हा LSG चा चेंडूंच्या बाबतीत दुसरा मोठा पराभव ठरला. यापूर्वी २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबादने ६२ चेंडू राखून बाजी मारली होती.
प्रथम फलंदाजीला आलेल्या लखनौला जोश हेझलवूडने सुरुवातीलाच हतबल केले. रिषभ पंत ( १) रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला होता, तर निकोलस पूरनचा ( १) त्याने त्रिफळा उडवला. एडन मार्करम ( १२) रसिख सलामच्या चेंडूवर झेलबाद झाला. मिचेल मार्श (४०), आयुष बदोनी ( ३८) व मुकुल चौधरी ( ३९) यांनी दमदार कामगिरी करून संघाला १४६ धावांपर्यंत पोहोचवले. भुवनेश्वर कुमारने ३, रसिखने चार आणि कृणाल पांड्याने २ विकेट्स घेतल्या. ४ षटकांत २० धावा देत १ विकेट्स घेणारा हेझलवूड सामनावीर ठरला.
Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...RCB ची सुरुवात काही खास झाली नाही. फिल सॉल्ट ७ धावांवर प्रिंस यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला. विराट कोहलीने ३४ चेंडूंत ४९ धावांची खेळी केली. रजत पाटीदारने १३ चेंडूंत २७ धावा, तर जितेश शर्माने ९ चेंडूंत २३ धावा कुटल्या. टीम डेव्हिड ( १४) व रोमारिओ शेफर्ड ( १४) यांनी संघाला १५.१ षटकांत जिंकवले. चिन्नास्वामी स्टेडियमवर २०१८ नंतर प्रथमच सामन्यात एकही अर्धशतकी खेळी झाली नाही. तीन प्रयत्नांत प्रथमच बंगळुरूने चिन्नास्वामीवर लखनौला पराभूत केले आहे.
IPL 2026 मध्ये RCB साठी Player of the Matchजेकब डफी विरुद्ध SRH
टिम डेव्हिड विरुद्ध CSK
फिल सॉल्ट विरुद्ध MI
जॉश हेझलवुड विरुद्ध LSG
२०२५ पासून RCB च्या दहा वेगवेगळ्या खेळाडूंनी 'सामनावीर' पुरस्कार जिंकले आहेत, कोणत्याही संघाच्या तुलनेत ही सर्वाधिक संख्या आहे.
या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत बदल पाहायला मिळाला. विराट कोहलीने ही कॅप आपल्या नावावर केली
२२८ धावा - विराट कोहली ( ५ सामने)
२२४ धावा - हेनरिच क्लासन ( ५ सामने)
२२२ धावा - रजत पाटीदार ( ५ सामने)
२१३ धावा - इशान किशन ( ५ सामने)
२०० धावा - वैभव सूर्यवंशी ( ५ सामने)
१८५ धावा- संजू सॅमसन ( ५ सामने)
१८४ धावा - यशस्वी जैस्वाल ( ५ सामने)
१८२ धावा - अंगकृश रघुवंशी ( ५ सामने)
१७६ धावा - ध्रुव जुरेल ( ५ सामने)
१७६ धावा - जॉस बटलर ( ५ सामने)