IPL 2026, RCB vs DC: दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीला नमवलं, 6 गडी राखून शेवटच्या षटकात जिंकला सामना
GH News April 18, 2026 10:10 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील 26व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सलाने  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 6 गडी राखून लोळवलं. खरं तर हा सामना आरसीबीला जिंकण्यासारखा होता. शेवटच्या षटकात 15 धावा रोखण्यात अपयश ठआलं. आयपीएल स्पर्धेत नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं तर हा निर्णय आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारच्या मनासारखा होता. त्याने तसं बोलूनही दाखवलं. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकात 8 गडी गमवून 175 धावा केल्या आणि विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दिल्ली कॅपिटल्सने 19.5 षटकात पूर्ण केलं. यासह स्पर्धेतील तिसऱ्या विजयाची नोंद केली.

दिल्ली कॅपिटल्सचा डाव

दिल्ली कॅपिटल्सला पहिल्याच षटकात धक्का बसला. पाथुम निस्संका 1 धाव करून भुवनेश्वर कुमारच्या षटकात पायचीत झाला. तर करूण नायरही काही खास करून शकला आणि त्याचा डाव 5 धावांवर आटोपला. समीर रिझवी आला तसा परत गेला. त्याने 3 चेंडूत 2 धावा काढल्या. या तिघांना भुवनेश्वर कुमारने तंबूचा रस्ता दाखवला. केएल राहुल 34 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार मारून 57 धावांवर बाद झाला. तर अक्षर पटेल 19 चेंडूत 3 चौकार मारून 26 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. डेविड मिलर आणि स्टब्सने या सामन्यात विजय मिळवून दिला. स्टब्सने 47 चेंडूत नाबाद 60, तर डेविड मिलरने 10 चेंडूत नाबाद 22 धावांची खेळी केली.

शेवटच्या षटकात काय झालं?

शेवटच्या षटकात दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 15 धावांची गरज होती. रोमारियो शेफर्डने पहिला चेंडू टाकला आणि मिलरने 1 धाव घेतली. स्टब्सने पुन्हा एक धाव घेतली आणि डेविड मिलरला स्ट्राईक दिली. दिल्लीला 4 चेडूत 13 धावांची गरज होती. तिसऱ्या चेंडूवर मिलरने उत्तुंग षटकार मारला आणि सामना 3 चेंडूत 7 धावा असा आला. त्याने चौथ्या चेंडूवर पुन्हा षटकार मारला आणि सामना आपल्या बाजूने ओढला. दोन चेंडूत 1 धाव हवी असताना पाचव्या चेंडूवर चौकार मारला आणि सामना जिंकवला.

आरसीबीचा डाव

आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना सावध सुरूवात केली. पहिल्या विकेटसाठी फिलिप सॉल्ट आणि विराट कोहली यांनी 52 धावांची भागीदारी केली. विराट कोहली 13 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला देवदत्त पडिक्कलही काही खास करू शकला नाही. त्याचा डावही 18 धावांवर आटोपला. खरं फिलिप सॉल्ट एका बाजूने फलंदाजी करत असताना दुसऱ्या बाजूला धडाधड विकेटची रांग लागली. रजत पाटीदार 8, टिम डेविड 26, जितेश शर्मा 14, रोमारियो शेफर्ड 1, कृणाल पांड्या 12 धावांवर बाद झाला. फिलिप सॉल्टने 38 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार मारत 63 धावांची खेळी केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.