व्हेस्पा ब्रँडच्या 80 वर्षपूर्ती निमित्त आलिशान स्कूटर लाँच, दमदार लूक आणि खास फिचर्स
GH News April 24, 2026 08:11 PM

इटलीची दुचाकी कंपनी Vespa ने भारतात तिची नवीन Vespa Tech 80th Special Edition लाँच केली आहे. Vespa स्कूटर ब्रँडला ८० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही नवीन स्पेशल एडिशन काढली आहे. या एडीशनमध्ये Vespa डिझाईनची झलक आणि आधुनिक टेक्नॉलॉजी मेळ पाहायला मिळत आहे. ही स्पेशल एडिशन 125cc आणि 150cc इंजिनाच्या सोबत येत आहे. यांना त्या लोकांसाठी खास डिझाईन केले आहे ज्यांना एक स्टायलिश आणि प्रीमियम शहरात चालवण्यासाठी स्कूटर हवी त्यांच्यासाठी ही बेस्ट एडीशन आहे.

स्कुटरचे डिझाईन

या स्कूटरचा सर्वात खास भाग याचे डिझाईन आहे. यात Verde Pastello नावाचा हलका हिरवा रंग देण्यात आला आहे, जो १९४० च्या दशकाच्या सुरुवातीला Vespa स्कूटरवरुन प्रेरित आहेत. हाच कलर स्कटूरच्या अनेक भागात देखील दिसत आहे. उदा. फ्रंट शील्ड ट्रीम, मिरर, हँडल आणि सस्पेंशन पार्ट्स. सीट, फुट रेस्ट आणि हँडल ग्रिप्समध्ये हा अनोखा हिरवा रंग वापरला आहे. ज्यामुळे याचा रेट्रो ( जुनी स्टाईल ) लूक आणखी जास्त आकर्षक बनवत आहे. एकूण मिळून ही स्कूटर जुनी डिझाईन आणि नवी फिचर्सचा एक शानदार कॉम्बिनेशन आहे.

लिमिटेड एडिशन स्कूटर

ही स्कूटर १९४६ मध्ये तयार झालेल्या पहिल्या Vespa मॉडलच्या धर्तीवर डिझाईल केले आहे. हीच्या चाकांनाही Vespa 98 सारखा जुन्या मॉडेलचा रेट्रो लूक दिला आहे. त्यावरही हिरवा रंग दिला आहे. ज्यात डायमंड कट सारखा फिनिश मिळते. हीच्या पुढच्या भागात व्हेस्पाच्या लोगोसोबत एक खास 80th बँच लावण्यात आला आहे. जो हिच्या 80 वर्षपूर्तीचा संकेत देतो. पाठच्या बाजूला 80 years of Vespa Est. 1946 असे लिहिलेले विशेष चिन्ह देण्यात आले आहे. जे सांगते की ही एक लिमिटेड एडिशन स्कूटर आहे. आणि खास उत्सवासाठी तयार केली आहे.

सेफ्टी फिचर्स आण इंजिन

आपल्या पारंपारिक शैली जपतानाही टेक 80th व्हेस्पा सध्याच्या पार्ट्सने तयार केलेली आहे. यात मानक रेंजचे हार्डवेअर आणि सेफ्टी फिचर्स कायम ठेवले आहेत. 125 सीसी व्हेरिएंटमध्ये 124.4 सीसीचे सिंगल सिलेंडर, एअर-कुल्ड इंजिन लावण्यात आले आहे. जे 9.5 हॉर्सपॉवर आणि 10.1 एनएमचे टॉर्क जनरेट करते. तर 150 सीसी

व्हर्जनमध्ये 149.5 सीसीचे सिंगल-सिलिंडर, एअर-कुल्ड इंजिन देण्यात आले असून ते 11.4 हॉर्सपॉवर आणि 11.6 एनएमचा टॉर्क जनरेट करते. दोन्ही इंजिन सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोबत येतात.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.