पंजाब किंग्सने IPLचा इतिहास-भूगोल बदलला! मोडले सर्व रेकॉर्ड्स, 265 धावांचा यशस्वी पाठलाग करत दि
Marathi April 25, 2026 11:25 PM

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स IPL 2026 : पंजाब किंग्सने आयपीएलच्या इतिहासात अभूतपूर्व पराक्रम करत सर्वात मोठा रन चेस पूर्ण केला. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाबने दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेट्सने पराभव करत इतिहास रचला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 264 धावांचा डोंगर उभारला, जो त्यांच्या आयपीएलमधील सर्वात मोठा स्कोअर ठरला. मात्र, पंजाबने अविश्वसनीय खेळी करत हा 265 धावांचा लक्ष्य 19व्या षटकातच गाठत विक्रम मोडला.

आयपीएलमधील सर्वात मोठे रन चेस

265 धावा – पंजाब किंग्स (विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स)
262 धावा – पंजाब किंग्स (विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स)
247 धावा – सनरायझर्स हैदराबाद (विरुद्ध पंजाब किंग्स)

पंजाबने स्वतःचाच विक्रम मोडत इतिहास घडवला. याआधी 2024 मध्ये त्यांनी केकेआरविरुद्ध 262 धावा चेस केल्या होत्या. आता 265 धावांचा डोंगरही त्यांनी पार केला.

केएल राहुलने ठोकले शतक

प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली, अर्शदीप सिंगने पथुम निस्संकाला बाद केले, जो सात चेंडूंमध्ये दोन चौकारांसह 11 धावांवर बाद झाला. त्यानंतर राहुल आणि नितीशने दिल्लीचा डाव सावरला आणि पंजाबच्या गोलंदाजांवर दबाव टाकला. राहुलने 47 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले, पण नितीश शतक पूर्ण करण्यापूर्वीच बाद झाला.

दिल्लीकडून केएल राहुलने 67 चेंडूंमध्ये 16 चौकार आणि नऊ षटकारांसह नाबाद 152 धावा केल्या, तर नितीश 44 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि चार षटकारांसह  91 धावा करून तंबूत परतला. डेव्हिड मिलर 3 धावांवर नाबाद राहिला. पंजाबकडून अर्शदीप सिंग आणि झेवियर बार्टलेट यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. केएल राहुल आणि नितीश राणा यांच्यातील दुसऱ्या विकेटसाठीच्या 220 धावांच्या भागीदारीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्ससमोर 265 धावांचे लक्ष्य ठेवले.

प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्याचा तांडव

पंजाबच्या विजयाची पायाभरणी प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्याने केली. दोघांनी पहिल्या 6 षटकांत 116 धावा ठोकत आयपीएल इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पॉवरप्ले स्कोअर नोंदवला. प्रभसिमरन सिंगने 26 चेंडूत 76 धावा केल्या आणि प्रियांश आर्याने 17 चेंडूत 43 धावा ठोकल्या.

मधल्या षटकांत पंजाबने 19 धावांत 3 विकेट्स गमावून अडचणीत सापडले होते. मात्र, कर्णधार श्रेयस अय्यरने धीराने खेळ करत 36 चेंडूत 71 धावांची मॅच-विनिंग खेळी केली आणि संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

हे ही वाचा –

Lungi Ngidi Injured : आयपीएलमध्ये हादरून टाकणारी घटना! लुंगी एनगिडी गंभीर जखमी; सायरन वाजवत ॲम्ब्युलन्स थेट मैदानात अन्…; हादरवणारे PHOTO

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.