इराण आणि अमेरिकेतील शांतता चर्चेची दुसरी फेरी रद्द झाली आहे. अमेरिकन शिष्टमंडळ पाकिस्तानात पोहोचण्यापूर्वीच इराणी अधिकाऱ्यांनी इस्लामाबाद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा वाढला आहे. चर्चेची दुसरी फेरी रद्द होताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांचा पाकिस्तान दौरा रद्द करण्याचा आदेश दिला आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, ’18 तासांचा प्रवास करण्यात आता काही अर्थ नाही. इराणला जेव्हा वाटेल तेव्हा त्यांनी आम्हाला फोन करावा.’
अमेरिकन अधिकाऱ्यांचा पाकिस्तान दौरा रद्दफॉक्स न्यूजच्या अहवालानुसार, ट्रम्प यांनी अमेरिकेचे वार्ताकार स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर आता इराणसोबत चर्चेसाठी पाकिस्तानला ज जाण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प म्हणाले की, अमेरिकन प्रतिनिधीमंडळाने पाकिस्तानसाठी 18 तासांचा विमान प्रवास करण्याचा काहीच अर्थ नाही. इराणसोबतच्या संघर्षात अमेरिकेकडे सर्व निर्णायक पर्याय उपलब्ध आहेत. इराणी नेते कधीही अमेरिकेला फोन करू शकतात.
इराणी अधिकारी ओमानला रवानाइराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे आपल्या अधिकाऱ्यांसह पाकिस्तानात पोहोचले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेतली. या बैठकीनंतर अराघची ओमानसाठी रवाना झाले आहेत. त्यानंतर ते रशियालाही जाणार आहे. अशाप्रकारे विविध देशांच्या मदतीने इराण हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहे.
अराघची यांनी ठेवल्या 10 अटीपाकिस्तानमधून रवाना होण्यापूर्वी अराघची यांनी अमेरिकेसोबत चर्चा करण्यासाठी 10 अटी ठेवल्याचे सांगितले जात आहे. इराणने यापूर्वीच स्पष्ट केले होते की ते अमेरिकेसोबत थेट चर्चा करणार नाहीत. धमक्या आणि दबावाच्या वातावरणात अमेरिकेसोबत थेट चर्चा शक्य नाही असं इराणी अधिकाऱ्यांनी म्हटलं होते. त्यामुळे आता ही चर्चा पाकिस्तानच्या माध्यमातून होणार आहे. तसेच अराघची यांनी आधीच सांगितले होते की, मी पाकिस्तान, नंतर ओमान आणि नंतर रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याचा उद्देश द्विपक्षीय मुद्द्यांवर समन्वय साधणे असल्याचे त्यांनी सांगितले होते.