IPL 2026 : मुंबईला मोठा धक्का, दुखापतीमुळे मॅचविनर खेळाडू स्पर्धेतून आऊट, कुणाचा समावेश?
GH News April 27, 2026 11:12 PM

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघापैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सला मोठा झटका लागला आहे. मुंबईचा ऑलराउंडर मिचेल सँटनर याला दुखापतीमुळे आयपीएलच्या 19 व्या मोसमातून (IPL 2026) बाहेर व्हावं व्हावं लागलं आहे. सँटनरला वानखेडे स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्स विरूद्धच्या सामन्यात फिल्डिंग करताना दुखापत झाली होती. सँटनरला या दुखापतीमुळे उर्वरित हंगामातून बाहेर व्हावं लागलं आहे. आयपीएलकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. तसेच मुंबईकडून मिचेल सँटनर याच्या जागी बदली खेळाडूचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. सँटनरच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फिरकीपटू केशव महाराज याचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबई इंडियन्सचा सुधारित संघ : हार्दिक पंड्या (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शेरफेन रदरफोर्ड, केशव महाराज, जसप्रीत बुमराह, क्रिश भगत, अल्लाह गझनफर, अश्वनी कुमार, विल जॅक्स, राज बावा, शार्दुल ठाकूर, दानिश मालेवार, मयंक रावत, कॉर्बिन बॉश, रघु शर्मा, रोहित शर्मा, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, मयंक मार्कंडे, रायन रिकेल्टन, रॉबिन मिन्झ आणि मोहम्मद सलाहुद्दीन इझार.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.