MS Dhoni: यंदा न खेळताच धोनीची 'आयपीएल'मधून निवृत्ती? अखेरच्या मोसमाची शक्यता
esakal April 28, 2026 01:45 PM

चेन्नई : महान क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याचे आयपीएलमधील पुनरागमन लांबणीवर गेले आहे. सुरुवातीला दुखापतीमुळे पहिले दोन आठवडे तो आयपीएल लढतींना मुकणार होता. मात्र, सराव लढतीमध्ये खेळताना त्याला पुन्हा एकदा दुखापत झाली. यामुळे महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या यंदाच्या मोसमात खेळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचा चेन्नई सुपर किंग्स संघामधील सहभाग अनिश्चित झाला आहे. आयपीएलमधील त्याची कारकीर्दही संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

चेन्नई संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग या वेळी म्हणाले की, महेंद्रसिंग धोनी दुखापतीमधून बरा होत पुनरागमन करण्यासाठी सज्ज होत होता. मात्र, सराव लढतीमध्ये खेळत असताना त्याला पुन्हा दुखापतीचा सामना करावा लागला. त्याच्या पोटरीचा स्नायू दुखावला. यामुळे आता त्याचे पुनरागमन लाबंणीवर गेले आहे. महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यासाठी प्रचंड मेहतन करीत होता. मात्र, पुन्हा एकदा दुखापत झाल्यामुळे आता प्रतीक्षा करावी लागणार आहे.

IPL 2026: तीन आठवडे अन् ६ सामने झाले, तरी धोनी अजूनही मैदानात का उतरला नाही? CSK च्या कोचने अखेर सत्य सांगितलं सहा सामने शिल्लक

चेन्नई संघाचे यंदाच्या आयपीएल मोसमातील सहा सामने शिल्लक आहेत. महेंद्रसिंग धोनीने यंदाच्या मोसमातील अद्याप एकही सामना खेळलेला नाही. आता तो कोणत्या सामन्याने पुनरागमन करेल हेही माहीत नाही.

१८ मे रोजी अखेरचा सामना

धोनीने यंदाच्या मोसमात आयपीएलमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्यास १८ मे रोजी होणारी लढत ही अखेरची असू शकते. कारण १८ मे रोजी चेन्नईचा संघ सनरायझर्स हैदराबादशी लढणार आहे. महत्त्वाची म्हणजे ही लढत चेन्नईत होणार आहे.

IPL 2026 : महेंद्रसिंग धोनीसमोर ठेवली गेलीय अट; CSK आधीच अडचणीत सापडलाय, त्यात हे नवं प्रकरण; डेवॉल्ड ब्रेव्हिसबाबतही अपडेट्स...

चेन्नईतील यंदाच्या मोसमातील ही अखेरची लढत असणार आहे. घरच्या मैदानावर महेंद्रसिंग धोनीला निरोप घेता येऊ शकणार आहे. अर्थात या सर्व जरतरच्या बाबी आहेत. प्रत्यक्षात महेंद्रसिंग धोनी व संघ व्यवस्थापन कोणता निर्णय घेते, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.