Latest Marathi News Live Update: संभाजीनगरमधील दोन्ही मृतदेहांची ओळख पटली
esakal April 28, 2026 01:45 PM
Sambhaji Nagar Live: संभाजीनगरमधील दोन्ही मृतदेहांची ओळख पटली

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथील एमआयडीसी परिसरात आज सकाळी दोन अज्ञात नवतरुणांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे दोन्ही मृतदेह काल मध्यरात्रीपासून घटनास्थळीच पडून असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दोन्ही तरुणांची ओळख पटली आहे. यामध्ये सचिन भागिरथ आरगडे, वय.29 वर्षे, धनगर पिंपरी,पो.शेवगा, जिल्हा जालना व गणेश झिरपे,वय.30 वर्षे,रा.श्री कॉलनी, बिडकीन अशी मयत तरुणांची नावे आहेत.

Nagpur Live: उद्धव ठाकरेंनी उमेदवार व्हावं- नाना पटोले

''आमच्या पक्षाने उद्धव ठाकरे यांना उमेदवार व्हा, असं सांगितलं आहे. आता काय करायचे तो त्यांचा प्रश्न आहे त्यांच्याकडून अजून रिप्लाय आलेला नाही.'' विधान परिषद निवडणुकीवरुन नाना पटोलांनी ही माहिती दिली.

Nagpur Live: नाना पटोले यांना काही काळ विमानतळाच्या गेटवर थांबवून ठेवलं

सीआयएसफच्या जवानाकडून नाना पटोले यांना आयकार्ड मागवण्यात आलं होतं, त्यामुळे ते काही क्षण नागपूर विमानतळाच्या गेटवर थांबले होते. त्यानंतर इतर अधिकारी आले त्यांनी नाना पटोले यांना ओळखलं आणि विमानतळावर आत सोडलं. नागपूरवरुन मुंबईला जाताना नागपूर विमानतळावर हा प्रकार घडला.

Chhatrapati Sambhaji Nagar : बिडकीन एमआयडीसीत २ तरुणांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथील डि एम आय सी (DMIC) परिसरात आज सकाळी दोन अज्ञात नवतरुणांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे दोन्ही मृतदेह काल मध्यरात्रीपासून घटनास्थळीच पडून असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Solapur : भोंदूबाबा मनोहर भोसलेचा आणखी एक कारनामा, ६ एकर सरकारी जमिनीवर कब्जा

करमाळ्याचा भोंदू बाबा मनोहर भोसले याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. त्याने घोटी गावातील शासकीय पाझर तलावाच्या 17 एकर जमिनीमध्ये अतिक्रमण करून सहा एकर जमिनीवर कब्जा मिळवला आहे. या अतिक्रमण केलेल्या जमिनीमध्ये फार्महाऊस ,जनावरांचा गोठा, नारळाची बाग आणि भलीमोठी विहीर खोदली आहे. यात आणखी कहर म्हणजे पाझर तलावातून बेकायदेशीर पाणी उपसा करून तो स्वतःच्या शेततळ्यात साठवतो अशी माहिती स्थानिक शेतकर्यांनी दिली आहे.

Pune : लोणावळा लोकल आज पुणे स्टेशनवरून सुटणार नाही

पुणे ते लोणावळा लोकल आज पुणे स्टेशन वरून सुटणार नाहीत. दुपारी १ पर्यंत सगळ्या लोकल या शिवाजीनगर स्टेशन वरून सुटणार आहेत. सगळ्या लोकल १ वाजे पर्यंत पुणे स्टेशन वरून नाही तर शिवाजी नगर स्टेशन वरून सुटणार आहेत.

Nashik News : निदा खानचे कनेक्शन मालेगाव आणि मलेशियाशी

टिसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिचे मालेगाव आणि मलेशियाशी कनेक्शन असल्याचं समोर येत आहे. निदा खान सध्या फरार असून तिने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे.

Nashik : मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून महिलेचा मृत्यू

- नाशिकच्या मेडिकल कॉलेजमधील लिफ्ट दुर्घटनेचा सीसीटीव्ही समोर

- काल दुपारी मेडिकल कॉलेजमधील लिफ्टमध्ये मान अडकून झाला होता महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू

- मृत महिलेच्या कुटुंबीयांकडून लिफ्ट दुर्घटनेवर करण्यात आले होते गंभीर आरोप

- तर महिला कर्मचाऱ्याने सुरक्षा नियमांचं पालन न केल्याचा मेडिकल कॉलेज प्रशासनाचा होता दावा

Nagpur News : नागपुरात १० दिवसात १३ अनोळखी मृतदेह आढळले

- नागपूरकर अक्षरशः उष्णतेच्या तडाख्यात होरपळत आहेत... नागपूर शहरात गेल्या १० दिवसांत शहरात तब्बल १३ अनोळखी व्यक्तींचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे... उष्माघाताचा संशय व्यक्त केला जात असला तरी ‘डेथ ऑडिट’नंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे...

- ४१ ते ४५ अंश सेल्सिअस तापमानामुळे शहर जणू ‘आगीची भट्टी’ बनले आहे... दुपारीच नव्हे तर रात्रीही उष्ण झळा जाणवत आहेत...

- मेयो आणि मेडिकल रुग्णालयात आलेल्या मृतदेहांमध्ये बहुतेक ३२ ते ५५ वयोगटातील पुरुषांचा समावेश आहे...

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.