अनिल अंबानी यांच्यामागचे शुक्लकाष्ठ संपेना, खंडाळा फार्महाऊस आणि मुंबईतील फ्लॅट जप्त, 19,000 कोटींची एकूण संपत्ती जप्त
Tv9 Marathi April 28, 2026 10:46 PM

उद्योजक अनिल अंबानी ग्रुपच्या अडचणींचा ससेमिरा काही कमी व्हायचे नाव घेत नाहीए… सक्त वसुली संचालनालयाने ( ED ) मनी लॉड्रींग प्रकरणात पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. ईडीने रिलायन्स अनिल अंबानी ग्रुप ( RAAG ) ची ३,०३४ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. या ताजा कारवाईने आतापर्यंत समुहाच्या एकूण जप्त झालेल्या संपत्तीचा आकडा १९,००० कोटी रुपयांच्या पलिकडे गेला आहे.

या संपत्तीवर ईडीची धाड

सक्त वसुली संचालनालयाच्या कारवाईच्या व्याप्तीत रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCOM) आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने ( R-Infra ) संबंधित मौल्यवान संपत्ती आल्या आहेत. जप्तीची संपत्तीत या संपत्तीचा समावेश आहे.

मुंबईस्थित आलीशान फ्लॅट आणि खंडाळाचा फार्महाऊस…

अहमदाबादच्या जवळ सानंद येथील जमीनीचा मोठा भाग

राइजई (RiseE) ट्रस्ट स्ट्रक्चर अंतर्गत ठेवलेले गेलेले रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरचे 7.71 कोटी शेअर्स

ही संपूर्ण कारवाई प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग एक्ट (PMLA), 2002 अंतर्गत कठोर तरतूदी अंतर्गत केली आहे

19,344 कोटी रुपयांपर्यंत जप्तीची व्याप्ती –

अनिल अंबानी समूहाच्या बँकांच्या सोबत धोका

बँकांच्या सोबत सुरु असलेल्या फसवणूक आणि फंडाची हेराफेरीचा (Diversion of Funds) गंभीर आरोप आहे. ED अनेक काळापासून या कंपन्यांच्या आर्थिक देवाण-घेवाणीची चौकशी करत होते. ताज्या घटनेत केलेल्या जप्तीमुले या प्रकरणात जप्त केलेली संपत्तीची किंमत १९,३४४ कोटी रुपयांहून जास्त झाली आहे.

का होत आहे चौकशी ?

तपास यंत्रणांचा आरोप आहे की अनिल अंबानी समुहाच्या कंपन्यांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा वापर त्या कामांसाठी केला ज्या कामांसाठी कर्ज काढले होते. त्या ऐवजी निधीला अशा ठिकाणी वळवले, जे मनी लाँड्रींगच्या श्रेणीत येते. सध्या ईडीने या संपत्तीला अस्थायी रुपाने ( Provisionally Attached ) जप्त करुन प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली आहे.

गुंतवणूकदारांची आणि कॉर्पोरेट जगताची नजर आता या गोष्टींवर टीकली ही कायदेशीर संकटात अकडलेल्या अनिल अंबानी हे आता या संकटातून बाहेर कसे येतात याकडे सर्वांची नजर लागली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.