L&T Tech प्रत्येक शेअरवर देणार 40 रुपये लाभांश, रेकाॅर्ड तारीख याच महिन्यात
ET Marathi May 04, 2026 09:45 AM
मुंबई : शेअर बाजारातील अनेक कंपन्यांनी घसघशीत लाभांश देऊन आपल्या गुंतवणूकदारांना खूश केले आहे. यामधील एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसने आता आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी प्रति शेअर ४० रुपयांचा अंतिम लाभांश जाहीर केला आहे. याची रेकॉर्ड तारीखही निश्चित केली आहे.

एजीएम तारीख
एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसने २२ एप्रिल रोजी तिमाही निकाल जाहीर करताना केली. याची रेकाॅर्ड तारीख २२ मे आहे. कंपनी १ जून रोजी होणाऱ्या आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) लाभांशाला भागधारकांची मंजुरी घेईल. या तारखेपर्यंत कंपनीचे शेअर्स असणारे गुंतवणूकदार या लाभांशासाठी पात्र असतील. मंजुरी मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत दिला जाईल. यापूर्वी कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ साठी १८ रुपयांचा अंतरिम लाभांश दिला होता.

मार्च तिमाहीचे निकाल
एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसचा जानेवारी-मार्च २०२६ तिमाहीसाठीचा निव्वळ एकत्रित नफा वार्षिक तुलनेत ६.७५ टक्क्यांनी वाढून ३३२.१ कोटी रुपये झाला. तर एकत्रित महसूल ८.३ टक्क्यांनी वाढून २,८५७.९ कोटी रुपयांवर पोहोचला. संपूर्ण आर्थिक वर्ष २०२६ साठी एकत्रित महसूल १०,९९५.९ कोटी रुपये आणि निव्वळ नफा १,२७९.२ कोटी रुपये होता. कंपनीचा व्याज आणि करपूर्व नफा (EBIT) मागील तिमाहीतील ४१२ कोटींच्या तुलनेत ५.५% ने वाढून ४३५ कोटी रुपये झाला. EBIT मार्जिन मागील तिमाहीतील १४.८% वरून १५.२% पर्यंत सुधारला.

शेअर्सची कामगिरी
एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसचा शेअर्स ३६२५.७० रुपयांवर आहे. एका महिन्यात शेअरमध्ये १६ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर वर्षभरात शेअरमध्ये १९.३९% घट झाली आहे. शेअर्स बीएसईवरील ५२ आठवड्यांचा उच्चांक ४,७४६.९५ रुपये आणि नीचांक ३,०४६.८५ रुपये आहे.

भागधारकांची हिस्सेदारी
कंपनीचे बाजार भांडवल ३८,४०० कोटींपेक्षा जास्त आहे. हा शेअर्स बीएसई २०० निर्देशांकाचा भाग आहे. मार्च २०२६ च्या अखेरीस प्रवर्तकांकडे कंपनीतील ७३.५७ टक्के हिस्सा होता.
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.