पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून तब्बल १५ वर्षांची ममता बॅनर्जींची सत्ता संपुष्टात आलीय. भाजपने एकहाती सत्ता काबीज केलीय. अद्याप संपूर्ण मतमोजणी झाली नसली तरी भाजपने निर्णायक आघाडी घेतली आहे. भाजपने १४७ हा बहुमताचा आकडा ओलांडला असून २०० पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळवली आहे. तर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला शंभरी गाठणंही कठीण बनलं. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही पराभवाचा धक्का बसला. भवानीपूर या पारंपरिक मतदारसंघात एकेकाळचा सहकारी असणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांच्याकडूनच ममता बॅनर्जींचा दारूण पराभव झाला.
भवानीपूर विधानसभा मतदारसंघात ममता बॅनर्जी १५ व्या फेरीपर्यंत आघाडीवर होत्या. सुरुवातीपासून चुरशीची लढत दिसून आली. मात्र अखेरच्या फेऱ्यात ममता बॅनर्जी पिछाडीवर गेल्या. शेवटी सुवेंदू अधिकारी यांनी बाजी मारली. १६ व्या फेरीपासून त्यांनी आघाडी कायम ठेवली. ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर मतदारसंघात पराभव केला.
लुटलं, लुटलं, लुटलं! अनैतिक विजय, पराभव दिसताच ममता बॅनर्जी संतापल्या; १६व्या फेरीअखेर पिछाडीवर सुवेंदू दोन ठिकाणी विजयीममता बॅनर्जी यांना पराभूत करणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांनी याआधीही ममता बॅनर्जींना पराभवाचा धक्का दिला आहे. भवानीपूरमध्ये १५ हजार ११४ मतांनी सुवेंदू अधिकारी विजयी झाले आहेत. याआधी सुवेंदू नंदीग्राम आणि भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढले होते. तेव्हा नंदीग्राममध्ये सुवेंदू यांनी ममता बॅनर्जींना हरवलं होतं. दुसरीकडे सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूरसह नंदीग्राममधूनही यावेळी विजय मिळवला आहे.
तीन मुख्यमंत्र्यांचा पराभवदेशातील पाच राज्यात आज विधानसभा निवडणुकीची मतमोजणी झाली. यात तीन राज्यांमध्ये सत्ताधारी पक्षांना धक्का बसला. तामिळनाडूत टीव्हीकेनं सत्ताधारी स्टालिन यांना पराभवाची धूळ चारली. मुख्यमंत्री एमके स्टालिन यांचा टीव्हीकेच्या उमेदवाराने पराभव केला. तर केरळमध्येही मुख्यमंत्री पिनराई यांना पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचाही पराभव झाला. एकाच दिवशी तीन राज्याचे मुख्यमंत्री निवडणुकीत पराभूत झाले आहेत.