लातूर जिल्ह्यात अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे ,जिल्ह्यातला काही पेट्रोल पंपावर एक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत, तर अनेक पेट्रोल पंप बंद अवस्थेत आहेत, अचानक पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांनी इंधनासाठी मोठ्या रांगा पेट्रोल पंपावर लावले आहेत.
अक्षय कर्डिले विजय झाल्यानंतर आमदार म्हणून घरात पाऊल ठेवल्यानंतर कुटुंबात भावनिक वातावरणराहुरी पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा एक लाखांपेक्षा अधिक मदत मताधिक्याने विजय झाला दुपारपासूनच संपूर्ण मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी घेऊन रात्री उशिरा अक्षय कर्डिले हे घरी पोहोचल्यानंतर अत्यंत भावनिक असे वातावरण निर्माण झाले होते.स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती त्या जागेवर अक्षय कर्डिले यांनी मोठ्या फरकाने विजय मिळाला असला तरी वडिलांच्या जागेवर मिळवलेला विजय आणि दुसरीकडे वडील गमावल्याचे दुःख एकाच वेळी असल्याने घरी आल्यानंतर अक्षय कर्डिले यांना आपल्या आईसमोर अश्रू अनावर झाले आपल्या स्वर्गीय वडिलांच्या आठवणीने संपूर्ण कुटुंबीय भावनिक झाले होते. एकीकडे मुलगा जिंकण्याची खुशी तर दुसरीकडे पती गमावल्याचे दुःख अक्षय कर्डीले यांच्या आईला होते त्यामुळे दोघांनीही अश्रुला मोकळी वाट करून दिली हा भावनिक क्षण अत्यंत वेदनादायक असा होता.
nashik-malegaon-परीक्षार्थी विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी, साहाय्यक प्राध्यापकाला पोलिसांनी घेतले ताब्यातनाशिकच्या मालेगाव मधिल एका नामांकित कॉलेज मध्ये धक्का दायक घटना घडली असून,परिक्षार्थी विद्यार्थीनी कडे एका सहाय्यक प्राध्यापकाने शरीर सुखाची मागणी केल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. पेपरसाठी संशयीत प्राध्यापकाची एका वर्गावर पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पेपर संपल्याने दुपारी १२ वाजेपूर्वी वर्गातील इतर सर्व विद्यार्थी वर्गाबाहेर निघून गेले होते. मात्र, तक्रारदार विद्यार्थिनीचा पेपर पूर्ण व्हायचा बाकी असल्याने ती वर्गात शेवटपर्यंत बसून पेपर लिहित होती. यावेळी वर्गात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत संशयित प्राध्यापकाने या विद्यार्थिनीजवळ जाऊन तिच्याकडे अश्लील मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. महाविद्यालयीन व संबंधित संस्थेच्या प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून साहाय्यक प्राध्यापक वाजिद अली यास तडकाफडकी निलंबित करण्याची कारवाई केली आहे.तर हिंदुत्ववादी संघटनांच्या कानावर हे वृत्त जाताच त्यांनी मालेगाव कॅम्प पोलिसात धाव घेत या प्राध्यापकावर कठोर कारवाईची मागणी केलीय.