Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, १० तोळा सोनं २९००० रुपयांनी वाढले; 18K- 22K आणि 24K चे आजचे दर किती?
Saam TV May 06, 2026 07:45 PM
Summary -
  • जळगावच्या सराफा मार्केटमध्ये सोन्याच्या दरात मोठी उसळी

  • १० तोळा सोन्याच्या दरात २९,००० रुपयांची वाढ

  • चांदीच्या दरामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे

  • १० तोळा चांदीचे दर ७००० रुपयांनी महागले

संजय महाजन, जळगाव

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आज सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं-चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २९००० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये ७ हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आज सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

जळगावच्या सराफ बाजारात सोनं-चांदीच्या दारात विक्रमी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात २ हजार ९०० रुपयांची वाढ झाली आहे. आज १ तोळा सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला जीएसटीसह १ लाख ५५ हजार २२१ रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर, १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २९००० रुपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेटचे १० तोळा सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला जीएसटीसह १५ लाख ५२ हजार २१० रुपये खर्च करावे लागतील.

Gold Rate Today: खुशखबर! सलग पाचव्या दिवशी सोनं झालं स्वस्त; ₹६००० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

जळगावच्या सराफा मार्केटमध्ये आज चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरामध्ये ७० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये तब्बल ७ हजार रुपयांची वाढ झाली आहे. आज १ किलो चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जीएसटीसह २ लाख ५८ हजार ३५० रुपये मोजावे लागतील. सोना- चांदी दरात पुढच्या काही दिवसांत अजून वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे.

Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात घसरण; १० तोळ्यामागे २३,४०० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २,१३० रुपयांची वाढ झाली. या सोन्याचे दर १,५१,३१० रुपये इतके झाले आहेत. तर १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २१३०० रुपयांची वाढ झाली आहे. या सोन्याचे दर १५,१३,१०० रुपये झाले आहेत. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये १० हजार रुपयांची वाढ होऊन त्याचे दर २,६५,००० रुपये इतके झाले आहेत.

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा बदलले; वाचा तुमच्या शहरातील २२ अन् २४ कॅरेटचे दर
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.