छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव परिसरातल्या कौसर पार्क येथे अत्यंत गुप्त पद्धतीने ही पोलिसांनी कारवाई केली आहे. निदा खानला अटक केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा न्यायालय समोर तिला आणण्यात आले, कोर्टात प्रोडूस करून निदा खानचा ताबा आणि ट्रांजिट नाशिक पोलिसांकडे करण्यात आले. यानंतर नाशिक पोलिसांनी रातोरात नाशिककडे घेऊन गेले आहे.
नाशिक अपडेट -
- TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला आज नाशिक कोर्टात हजर करण्याची शक्यता
- काल छत्रपती संभाजी नगरमधून पोलिसांनी निदा खानला केली अटक
- गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल २७ दिवसांपासून निदा खान होती फरार
- धार्मिक भावना दुखावणे, महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींना मदत करणे, विशिष्ट धर्माचे ट्रेनिंग देण्याचा निदा खानवर आरोप
- मागील २७ दिवसांपासून निदा खानचा नाशिक पोलिसांकडून सुरू होता शोध
- गरोदर असल्याचं कारण देत निदा खानने अटकपूर्व जामिनासाठी ही केला होता प्रयत्न
- मात्र निदा खान छत्रपती संभाजी नगरमधील एका कॉलनीत भाड्याने फ्लॅट घेऊन राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर काल रात्री गोपनीय पद्धतीने पोलिसांची कारवाई
- नाशिक कोर्टाने अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेऊन अटक पूर्व जामीन मिळवण्याचा निदा खानचा होता प्रयत्न
खामगाव शहरात किरकोळ वादातून दोन गटात तुफान राडाबुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात निर्मल टर्निंग पॉईंट, मस्तान चौक परिसर या भागात काल रात्री किरकोळ वादातून दोन व्यक्तींमध्ये भांडण झालं त्यानंतर हा वाद इतका विकोपाला गेला की, मोठा जमाव दोन्ही बाजूने रस्त्यावर उतरला. त्यानंतर दोन्ही गटात तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले आहेत. तर काही वाहनांचही नुकसान झालं आहे. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात मिळवली सध्या या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त असून दंगा काबू पथक तैनात करण्यात आल आहे. परिसरात रस्त्यावर दगडांचा खच पडलेला आहे. सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
उल्हासनगर कुर्ला कॅम्पमधील बी.के. पान शॉपसमोर भीषण आगरात्री उशिरा एका जुन्या रिकाम्या कंटेनरने अचानक पेट घेतल्याने परिसरात धुराचे लोट पसरले त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या
त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाण्याचा मारा करत आग पूर्णपणे विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले , अखेर 1 ते दीड तासाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले , सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही , मात्र आगीच कारण मात्र कळू शकते नाही