Prince Harry Viral video: स्टेडियममध्ये मॅच चालू होती, लोक आपआपल्या सिटवरुन खेळाचा आनंद घेत होते. तेव्हा कॅमेऱ्याने अशा मोमेंटला कैद केले, ज्याने लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. लंडनच्या शाही घराण्याचे प्रिन्स हॅरी हे आपल्या हातात पॉपकॉर्नचा बॉक्स घेऊन त्याचा आस्वाद घेत मॅच पाहात होते. त्यावेळी त्यांच्या शेजारी बसलेल्या एका महिलेची चिमुरडी त्या बॉस्कमध्ये हात टाकून बिनधास्त पॉपकॉर्न खात होती. विशेष म्हणजे हॅरी यांना सर्वकाही माहिती असूनही ते त्यांना काहीच कळालेले नाही असा चेहरा करत त्या मुलीला खाऊ देत होते. या निरासग चिमुरडीचा आणि प्रिन्स हॅरी यांच्या वागणूकीचा हा क्षण प्रचंड व्हायरल झाला आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की ही चिमुरडी आईच्या कडेवरुन वारंवार प्रिन्स हॅरीच्या बॉक्समध्ये हात टाकून पॉपकॉर्न खात होती. आधी Prince Harry याकडे नजरअंदाज करत होते. परंतू त्याच्या चेहऱ्यावरील हलके हसू सांगत होते की ते जाणूनबुजून असे करत होते, म्हणजे मुलीने न घाबरता पॉपकॉर्न खात रहावे. सोशल मीडियातील लोक या क्षणाला ‘सर्वात प्रेमळ रॉयल क्षण’ असे म्हणत आहेत. तर अनेक युजर्सने लिहीलंय की इतक्या मोठ्या रॉयल परिवारातील असूनही Prince Harry इतके साधे आणि डाऊन टू अर्थ वागल्याने त्यांनी सर्वांचे हृदय जिंकले आहे.
मुलीच्या आईबद्दलही आल्या रिएक्शनमात्र, एकीकडे युजर्स Prince Harry यांच्या वागण्याचे कौतूक करत आहेत. तर दुसरीकडे लोक या मुलीच्या आई संदर्भात देखील कमेंट करत आहेत. अनेक युजर्सचे म्हणणे आहे की जर आपण त्या आईच्या जागी असतो तर आपल्या मुलीला असे कोणा इतराच्या खाण्यात हात घालू दिला नसता. तर काही युजरने म्हटले आहे की या आईने मुलीला रोखायला हवे होते आणि मुलांना सुरुवातीपासून अशा सवयी लावाव्यात असेही युजर्स म्हटले आहे. मात्र, अनेक युजर्सने या एक प्रेमळ आणि मजेशीर प्रसंग म्हटले असून यास आईच्या वागण्याला फारसा मोठा मुद्दा बनवण्याची गरज नाही.
येथे पाहा व्हिडीओ –
लोकांना आवडली Prince Harry ची सिम्पलीसिटीA lil girl was taking popcorn from Prince Harry, and he pretended not to notice so she could keep eating. pic.twitter.com/74lOTkl30s
— 🎼🌺Music Love♥️ (@ThoNg676733)
या व्हिडीओला पाहून अनेक लोकांना Prince Harry यांचा असा ग्राऊंड टू अर्थ अंदाज पुन्हा पाहायला मिळाला आहे. येथे ते एका राजेशाही घराण्यातील व्यक्ती नाहीत, तर एकदम सामान्य नागरिकांसारखे मुलीशी वागत आहेत. याच कारणाने छोटासा हा व्हिडीओ लोकांना एवढा आवडला आहे. आणि इंटरनेटवर लोक या व्हिडीओला पाहून म्हणत आहे की कधी-कधी अशा छोट्या-छोट्या गोष्टीतूनही मनाला आनंद मिळतो.