अवघ्या एका आठवड्यात पाच वाघांचा मृत्यू; कान्हा व्याघ्र प्रकल्पात कुत्र्यापासून अत्यंत घातक विषाणूचा संसर्ग, वन विभाग हायअलर्टवर
रजत वशिष्ठ, एबीपी माझा May 10, 2026 09:43 AM

Tiger Death Cases: मध्यप्रदेशातील 'कान्हा' व्याघ्र प्रकल्पात (Kanha Tiger Reserve) एकानंतर एक अशा पाच वाघांचा 'केनाईन डिस्टेंपर वायरस' (Canine Distemper Virus) म्हणजेच CDV मुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 21 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान टी -141 या वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचे एका नंतर एक झालेले मृत्यू (Tiger Death Cases) केनाईन डिस्टेंपर वायरसचा परिणाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. कान्हा व्याघ्र प्रकल्पातील (Kanha Tiger Reserve Tiger Death) अधिकाऱ्यांनी अशक्त होऊन मृत्युमुखी पडलेल्या वाघिणी आणि चारही बछड्यांचे नमुने जबलपूर येथील 'स्कूल ऑफ वर्ल्ड लाइफ फॉरेन्सिक अँड हेल्थ' या प्रयोगशाळेत पाठवले होते. प्रयोगशाळेने पाचही वाघांचा मृत्यू केनाईन डिस्टेंपर वायरसमुळे झाल्याचे प्रमाणित केले आहे. (Kanha Tiger Reserve Tiger Death) 

धक्कादायक बाब म्हणजे कॅनाईन डिस्टेंपर वायरस 'कुत्रा वर्गीय' प्राण्यांचा आजार असून सध्या तो 'मांजर वर्गीय' प्राण्यांमध्ये म्हणजेच canine ऐवजी feline वर्गीय प्राण्यांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळेच वाघ आणि बिबट हे मांजर वर्गीय प्राणी केनाईन डिस्टेंपर वायरसमुळे आजारी पडत आहेत. वन्य प्राण्यांच्या संरक्षणाच्या अनुषंगाने ही अत्यंत धोकादायक आणि आव्हानात्मक बाब आहे. वाघीण आणि तिच्या चार बछड्यांच्या अशा पद्धतीने कुत्र्यापासून संक्रमण झालेल्या विषाणूमुळे मृत्यू झाल्यानंतर कान्हा व्याघ्र प्रकल्पाचा प्रशासन तसेच संपूर्ण मध्य प्रदेशातील वनविभाग सावध झाला आहे.

Kanha Tiger Reserve Tiger Death: मध्यप्रदेश वन विभाग हाय अलर्टवर! लगतच्या महाराष्ट्रातही संसर्गाचा धोका?

कान्हा व्याघ्र प्रकल्पातील ज्या 'सरही' सेक्टरमध्ये ही घटना घडली आहे, तिथे पाच वर्ग किलोमीटरचा भाग 'नो गो झोन' करण्यात आला आहे. संपूर्ण परिसरात इतर वाघांवर नजर ठेवण्यासाठी हत्तीवरून गस्त केली जात आहे. परिसरात 40 कॅमेरा ट्रॅप बसवण्यात आले आहे. जंगलातील पानवठ्यांमधील पाण्याची सतत सॅम्पलिंग केली जात आहे. प्राण्यांच्या विष्ठेची ही सॅम्पलिंग केली जात आहे. कान्हा व्याघ्र प्रकल्पाच्या अवतीभवतीच्या सुमारे 80 गावातील कुत्र्यांचे लसीकरण ही सुरू करण्यात आले आहे (वाघ आणि बिबटचे लसीकरण करणे कठीण असल्याने या आजाराचा स्त्रोत ठरणाऱ्या कुत्र्यांचे लसीकरण केले जात आहे.)

Tiger Death: वन्यजीवांसह वाघाच्या संरक्षणाबद्दल नवं चॅलेंज!!

दरम्यान, सरही सेक्टरच्या जवळपासच्या गावकऱ्यांनी वाघांच्या मृत्यू संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली असून वाघांचा मृत्यू दुर्दैवी असून पर्यटन क्षेत्रावर अत्यंत विपरीत परिणाम घालणारा ठरेल अशी भीती व्यक्त केली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र संक्रमण आणखी वाघापर्यंत आणि इतर वन्य प्राण्यांपर्यंत वाढणार नाही, यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला आहे.

Tiger Reserve : महाराष्ट्रातही संसर्गाचा धोका? वन विभाग हाय अलर्टवर!

कान्हा व्याघ्र प्रकल्पात एकानंतर वाघीण आणि तिच्या चार बछड्यांचा (एकूण पाच वाघ) मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रातही वाघ आणि इतर वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एबीपी माझा ने यासंदर्भात "वाईल्ड सीईआर" संस्थेचे अध्यक्ष आणि वन्यप्राणी पशुवैदक ( वन्य प्राण्यांचे डॉक्टर) डॉ. बहार बाविस्कर यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी या बाबत माहिती देताना सांगितलं कि, मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पात जे काही घडत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पेंच, आणि ताडोबा मधील वाघांसाठी ही धोका निर्माण झाल्याचे ते म्हणाले. मुळातच 'केनाईन डिस्टेंपर वायरस" कुत्रावर्गीय प्राण्यांचा आजार असताना तो सध्या मांजर वर्गीय प्राण्यांमध्ये म्हणजेच feline वर्गामध्ये पसरत आहे. हे कुत्रावर्गीय प्राण्यांमध्ये वायरस प्रमाणाबाहेर वाढल्याचे हे संकेत असल्याचे डॉ बाविस्कर म्हणाले. या स्थितीमुळे मांजरवर्गीय वन्य प्राण्यांची सुरक्षितता मोठ्या प्रमाणावर धोक्यात आल्याचे मत ही त्यांनी व्यक्त केले.

कुत्र्याच्या शरीरातील वायरस वाघापर्यंत कसे पोहोचले?

1) वाघ किंवा बिबटने शिकार केल्यानंतर अनेक वेळेला ती अर्धवट खाऊन सोडून देतात आणि दुसऱ्या दिवशी सुरक्षित वेळेवर येऊन पुन्हा खातात. दरम्यानच्या काळात वनक्षेत्र जवळच्या गावातील कुत्रे ती शिकार खातात.. त्यामुळे मृत शिकारीच्या मांसाच्या माध्यमातून विषाणू संक्रमण वाघ आणि बिबट पर्यंत पोहोचतो.

2) शिवाय जंगलातील पाणवठ्यांपर्यंत जर संक्रमित कुत्रे पोहोचून पाणी पित असतील तर उरलेल्या पाण्यातूनही वाघ आणि बिबट पर्यंत विषाणू पोहोचू शकतो.

3) जर संक्रमित कुत्र्याची शिकार वाघ किंवा बिबटणे केली आणि त्याला खाल्लं, तर कुत्र्याच्या शरीरातील विषाणू संक्रमित होऊन वाघ आणि बिबट पर्यंत पोहोचतो.

उपाय काय?

वाघ आणि बिबट चे लसीकरण करणे शक्य नसल्यामुळे या विषाणूचा स्त्रोत ठरणाऱ्या कुत्र्यांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे आवश्यक आहे.. त्यासाठी व्याघ्र प्रकल्पाच्या खास करून बफर झोनच्या अवतीभवतीच्या गावातील सर्व कुत्र्यांचे लसीकरण केले पाहिजे असे डॉ. बाविस्कर म्हणाले.

कुत्र्यांपेक्षाही वाघ आणि बिबटला या विषाणूचा धोका का?

कुत्रावर्गीय प्राण्यांमध्ये केनाईन डिस्टेंपर वायरस फक्त श्वसन संबंधी समस्या निर्माण करतो.. मात्र वाघ आणि बिबट सारख्या मांजरवर्गीय प्राण्यांमध्ये हा विषाणू श्वसनासह मज्जासंस्थे वर (न्यूरोलॉजिकल अंगावर) आक्रमण करतो.. त्यामुळे वाघ आणि बिबट त्याचा ओरिजिनल अस्तित्वच विसरू शकतात असा ही धक्का संभवतो.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.