Riteish Deshmukh on Women Crime: पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणाने (Nasrapur Case) संपूर्ण महाराष्ट्र हादरला. साडे तीन वर्षांच्या चिमुरडीवर 65 वर्षीय नराधमाने अत्याचार करत तिला संपवलं. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरातून संतापाची लाट उसळली. 'त्या नराधमाला लोकांच्या ताब्यात द्या, फाशी द्या' अशी मागणी करत संतप्त नागरिकांनी आंदोलनही केली. या वाढत्या अत्याचारांच्या प्रकारांवर रोष दिसून येत असताना अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh)यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय. सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान 'युवा हिंदुस्तान'कडून राजा शिवाजी चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलले .
कायद्यात बदल करून कठोर शिक्षा पुन्हा आणता आली तर अत्याचाराच्या घटनांना आळा बसेल; छत्रपतींच्या बद्दल बोलताना सर्वांनी आदर, मर्यादा, श्रद्धा राखून बोललं पाहिजे असं आवाहन अभिनेता रितेश देशमुख यांनी केले.
रितेश म्हणाला," महाराष्ट्राच्या मातीत एकेकाळी स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना चौरंग करण्याची शिक्षा मिळत होती, त्यामुळे ज्या पद्धतीने महाराष्ट्र मध्ये अल्पवयीन मुली, स्त्रियांच्यावर अत्याचाराच्या घटना घडतायात ते पाहता आता कायद्यात बदल करून कठोर शिक्षा पुन्हा आणता आली तर चांगलं होईल आणि अत्याचाराच्या घटनांना आळा बसू शकेल" असे मत अभिनेता रितेश देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान कडून राजा शिवाजी चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला होता. या शोसाठी रितेश देशमुख यांनी उपस्थित दर्शवली. यावेळी देशमुख प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तसच "छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास न करता काही जण वक्तव्य करतात, त्यामुळे छत्रपतींच्या बद्दल बोलताना सर्वांनी आदर, मर्यादा, श्रद्धा राखून बोललं पाहिजे" असे आवाहन ही रितेश देशमुख यांनी केले.
रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित राजा शिवाजी या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा आहे. ' राजा शिवाजी ' पोहोचलाय . केवळ वीकेंडलाच नाही तर वीकडेजमध्ये हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसतोय. छत्रपती शिवरायांच्या शौर्यावर आधारित असणारा राजा शिवाजी हा 'पिरियड ड्रामा ' आहे. त्यामुळे या सिनेमात अनेक दिग्गज कलाकारांची पाहायला मिळतेय. बॉलीवूड सह मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत. रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, सलमान खान, विद्या बालन, फरदीन खान, बोमन इराणी, महेश मांजरेकर, भाग्यश्री पटवर्धन, सचिन खेडेकर, जेनेलिया देशमुख, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते यांचा यात समावेश आहे.