Mumbai Weather: मुंबईत उन्हाच्या तडाख्यात वाढ, उष्णतेची लाट कायम; आर्द्रतेमुळे मुंबईकर घामाघूम
esakal May 10, 2026 04:45 PM

मुंबई : राजधानी मुंबईत उन्हाचा कडाका दिवसेंदिवस तीव्र होत आहे. शनिवारी (ता. ९) मुंबईतील विविध भागांत तापमानात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. भारतीय हवामान विभागाच्या स्वयंचलित हवामान केंद्रांनी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, राम मंदिर परिसरात सर्वाधिक ३९.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

हवामान विभागाच्या नोंदीनुसार, उपनगरातील विक्रोळी भागातही पारा ३८.८ हॅलोपर्यंत पोहोचला होता. इतर भागांतील कमाल तापमानाची स्थिती पाहिल्यास सर्वाधिक राम मंदिर ३९.० अंश सेल्सिअस, विक्रोळी : ३८.८, टाटा पॉवर (चेंबूर) ३६.६, विद्याविहार ३५.७, दहिसर ३५.७ आणि वांद्रे: ३५.४ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. सांताक्रूझ आणि कुलाबा या मुख्य वेधशाळांमध्येही सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे.

Mumbai Weather: मुंबई तापली! उपनगरात पारा ३८ अंशांवर; राम मंदिर परिसरात सर्वाधिक तापमानाची नोंद अंबरनाथचा पारा ४३.४ अंशांवर

महामुंबईत तापमानाने पुन्हा चाळिशी गाठली असून शनिवारी (ता. ९) ठाणे जिल्ह्यात अंबरनाथमध्ये यावर्षी मे महिन्यातील सर्वाधिक ४३.४ अंश सेल्सिअस तापमान नाेंदले गेले. कल्याण, बदलापूरमध्येही अनुक्रमे ४३.१ अंश आणि ४३ अंशांची नाेंद झाली. दरम्यान, मुंबईत राम मंदिर परिसरात सर्वाधिक ३९.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांच्या नोंदीनुसार, मे महिन्यात ठाणे जिल्ह्यात अंबरनाथमधील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान आहे. कडक उन्हामुळे आणि वाढलेल्या उकाड्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट होता. त्यानंतर अंबरनाथ-बदलापूरमध्ये दुपारी ४च्या सुमारास काळे ढग दाटून धुळीच्या वादळासह जोरदार वारे वाहू लागले. त्यानंतर शहरांत जोरदार सरीही कोसळल्या. त्यामुळे या शहरांतील तापमान ४३ अंशांवरून ३१ अंशांपर्यंत घसरले.

Megablock: मध्य रेल्वेवर दोन दिवस विशेष ब्लॉक, लोकलसह मेल-एक्स्प्रेसवरही परिणाम, पण कधी? पाहा वेळापत्रक ठाणे जिल्ह्याचे तापमान (अंश सेल्सिअस)
  • अंबरनाथ ४३.४

  • कल्याण ४३.१

  • बदलापूर ४३

  • डोंबिवली ४२.८

  • मुंब्रा ४२.५

  • नवी मुंबई ४०.५

  • ठाणे ४०.२

काळजी घेण्याचे आवाहन

तापमानासोबतच हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ५० ते ५८ टक्क्यांच्या दरम्यान राहिल्याने मुंबईकरांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा अधिक तीव्र जाणवत असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

परिसर तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
  • राम मंदिर ३९.०

  • विक्रोळी ३८.८

  • चेंबूर ३६.६

  • विद्याविहार ३५.७

  • वांद्रे ३५.४

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.