निदा खानने पीडितेला काय-काय पाठवलं? घरी जाऊन धार्मिक विधी, नावही बदलण्याचा कट; मतीन पटेल अन् मा
Marathi May 11, 2026 04:25 PM

निदा खान: नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर अत्याचार करून तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील मुख्य संशयित निदा खान (Nida Khan) हिची विशेष तपास पथकाने (SIT) कसून चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बाबी समोर येत आहेत. निदाने केवळ पीडितेचे मतपरिवर्तन केले नाही, तर तिच्या घरात जाऊन स्वतःच्या धर्माचे विधी केल्याचे आणि पीडितेला विशिष्ट प्रार्थना करण्यास भाग पाडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Nida Khan: नाव बदलण्याचा आणि ब्रेनवॉशचा कट

संशयित निदा खान हिने पीडितेचे मूळ नाव बदलून ‘हानिया’ करण्याचा कट रचला होता. यासाठी तिने पीडितेला धार्मिक मुद्द्यांशी संबंधित तब्बल 171 लिंक्स पाठवल्या होत्या, जेणेकरून तिचे पूर्णपणे मतपरिवर्तन करता येईल. पीडितेच्या घरी जाऊन तिला धार्मिक शिक्षण देणे, ठराविक पोशाख परिधान करायला लावणे आणि धर्माची प्रार्थना घेण्याचे धक्कादायक प्रकार निदाने केल्याचे एसआयटीच्या तपासात उघड झाले आहे.

Nida Khan: आश्रयदाता आणि ‘एमआयएम’ कनेक्शनचा तपास

26 मार्चपासून फरार असलेल्या निदाला 7 मे रोजी छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली होती. निदा ज्या फ्लॅटमध्ये लपली होती, तो फ्लॅट तिच्या मावशीचा नसून संशयित एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी उपलब्ध करून दिल्याचे समोर आले आहे. निदा गर्भवती असल्याने तिच्यासोबत तिचे आई-वडील आणि मावशीदेखील तिथे उपस्थित होते. निदा ही ‘एमआयएम’च्या नगरसेवकापर्यंत कशी पोहोचली आणि तिला या काळात कोणी आर्थिक रसद पुरवली, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Nida Khan: पोलीस कोठडीत वाढ होण्याची शक्यता

निदाची सुरुवातीची पोलीस कोठडी आज, सोमवारी (दि. 11) संपत असल्याने तिला पुन्हा नाशिकरोड न्यायालयात हजर केले जाणार आहे. तपासातील प्रगती आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस तिच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करणार आहेत. यासह या प्रकरणातील इतर संशयित दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांचाही ताबा एसआयटी घेणार असून, तिघांची समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे.

Nashik TCS Case: नाशिकमध्ये नऊ गुन्ह्यांची नोंद

निदा खानसह तिच्या साथीदारांविरोधात नाशिकमध्ये आतापर्यंत अत्याचार, विनयभंग, धार्मिक भावना दुखावणे आणि कट रचून धर्मांतर करणे अशा विविध कलमांन्वये नऊ गुन्हे दाखल आहेत. मुंबई नाका पोलिसांनीही या टोळीविरोधात कठोर कलमे लावून तपास सुरू केला आहे.

Nashik TCS Case: निदा खानचा मोबाइल क्लोनिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवला

दरम्यान, TCS प्रकरणातील आरोपी निदा खान हिचा मोबाईल क्लोनिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. मोबाईलमधून डिलिट केलेले मेसेज, व्हिडीओ आणि संपर्क क्रमांक पुन्हा रिकव्हर करण्यात येणार असून, त्यातून अनेक महत्त्वाच्या बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. तसेच कॉल डिटेल्स, वारंवार संपर्कात असलेल्या व्यक्ती, फरार काळातील लोकेशन हिस्ट्री आणि प्रवासाचा तपशीलही SIT कडून तपासला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा

Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला…; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.