Shiva Temple : महाराष्ट्रातील ‘या’ शिवमंदिराचं फक्त उन्हाळ्यातच होतं दर्शन
Marathi May 23, 2026 08:25 AM

महाराष्ट्रात अनेक प्राचीन मंदिरे आहेत आणि त्यांची रहस्य नेहमीचं आपल्याला थक्क करतात. महाराष्ट्रात एक असं अनोखं शिवमंदिर आहे, जे वर्षातील तब्बल 8 महिने पाण्याच्या प्रचंड प्रवाहाखाली पूर्णपणे अदृश्य असतं. हिवाळा संपून जेव्हा उन्हाळा सुरू होतो, तेव्हाचं हे मंदिर पाण्याच्या बाहेर येतं आणि भाविकांना महादेवाचे दर्शन घेता येतं. महाराष्ट्रातील वास्तुकलेचा आणि इतिहासाचा एक अद्भूत नजराणा म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते.

महाराष्ट्रातील पुण्यात हे मंदिर आहे. पुणे शहराला एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला असून याच निसर्गरम्य तालुक्यातील डोंगररांगांच्या कुशीत हे मंदिर वसलेलं आहे. वाघेश्वर असं या मंदिराचं नाव आहे.  हे अनोखं मंदिर वर्षातील 8 महिने धरणाखाली बुडालेलं असतं. वर्षातून फक्त 4 महिनेचं महादेवाचं दर्शन होतं. या मंदिराचा थेट छत्रपती शिवरायांशीही संबध आहे. महाराजांनी कोकण-सिंधुदुर्गची मोहिम फत्ते केल्यानंतर ते वाघेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते.

हेही वाचा – पाण्यात तरंगणाऱ्या रस्त्याचं गाव

वाघेश्वर मंदिर 700 ते 800 वर्ष जुनं आहे. संपूर्ण मंदिर दगडांनी बनवलेलं आहे. हेमाडपंथी शैलीत असेलेल वाघेश्वर मंदिर पर्यटकांचे विशेष आकर्षण असते. पावसाळा आणि त्यांनतरचे काही महिने असं मिळून हे मंदिर 8 महिने पाण्याखाली असतं. साधारण मार्च महिन्यात पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर हे मंदिर पाण्याबाहेर येतं.  कोणतेही सिमेंट किंवा आधुनिक साहित्य न वापरता केवळ दगड एकमेकांत घट्ट बसवून हे मंदिर उभारण्यात आलं आहे. आज मंदिराचा बहुतांश भाग उद्ध्वस्त झाला असला तरी गाभारा अजूनही शाबूत असून त्यावरील कोरीव काम पर्यटकांना थक्क करतं.

हेही वाचा – Educational Tourist Spots : उन्हाळी सुट्टीत मुलांना दाखवा ही माहितीपर पर्यटन स्थळे

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.