काठमांडू: माऊंट एव्हरेस्ट मोहीम यशस्वी करून खाली उतरत असताना, दोन भारतीय गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. अरुणकुमार तिवारी आणि संदीप आरे अशी या गिर्यारोहकांची नावे आहेत. एव्हरेस्टवरून उतरत असताना, त्यांची दमछाक झाली.
farmer Success Story: पहिल्याच वर्षी 20 टन केशर आंब्याचे उत्पादन; मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या शेतात बहरली आंबराई!त्यांना वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र त्यात यश आले नाही, असे ‘एक्स्पेडिशन ऑपरेटर्स असोसिएशन’चे सरचिटणीस ऋषी भंडारी यांनी सांगितले. यातील आरे यांनी बुधवारी एव्हरेस्ट सर केले होते, तर तिवारी गुरुवारी शिखरावर पोहोचले होते.
शिखरापासून जवळच असलेल्या हिलरी स्टेप येथे तिवारी आजारी पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर, एव्हरेस्टवर बुधवारी आरे यांच्यासह २७४ गिर्यारोहकांनी चढाई केली होती. यामध्ये आरे यांच्यासह तीन भारतीयांचा समावेश होता.
Raj Thackeray: राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख सदावर्तेंना भोवला; “जरा जपून फिरा” म्हणत राजू पाटलांचा इशारा, रवींद्र चव्हाणांनाही टोला..शिखरावर पोहोचताच आरे यांना हिमअंधत्व आले, त्यामुळे शेर्पांच्या मदतीने त्यांना दुसऱ्या कॅम्पपर्यंत आणण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती अधिक बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला.