चंद्रपूरमध्ये वाघाचा 13 महिलांवर एकाचवेळी हल्ला, चार जणींचा मृत्यू, उष्णता प्रचंड वाढल्याने वाघ आक्रमक?
तुषार कोहळे May 23, 2026 09:43 AM

Chandrapur Sindewahi Tiger Attack in Woman : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्यात (Tigress Attack) एकाच वेळी चार महिलांना आपले प्राण गमवावे लागले. हि असामान्य घटना असून बहुदा राज्यातील पहिलीच घटना आल्याचे बोललं जात आहे. मात्र या दुर्दैवी घटनेत वाघ इतका उग्र का झाला? त्यांना महिलांवर हल्ला का केला असावा? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहे. दरम्यान, या हल्ल्यामागे ब्रह्मपुरी (Brahmapuri) येथील 47 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले तापमान (Temperatures) हे देखील एक कारण असू शकतं, असं तज्ज्ञांना वाटतंय.

कारण वाघांना उन्हाचा प्रचंड त्रास होतो. शरीराचे तपमान कमी कण्यासाठी ते पाण्यात असतात. मात्र त्या क्षणी वाघाला शरीराचे तापमान कमी करण्यासाठी पाणी मिळले नसल्याने वाघावर मानसिक ताण व चिडचिडेपणा वाढला असावा. त्यावेळी तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या या महिला वाघाच्या टप्प्यात आल्या असाव्या आणि त्यातून पण हा हल्ला झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे या घटनेतून उन्ह व वाघाचे मानसिक आरोग्य यावर पण अभ्यास व्हायला पाहिजे, असे मत वाईल्ड लाईफ तज्ञ उदयान पाटील यांना वाटत आहे.

Chandrapur Tiger Attack : जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील ही पहिली घटना असण्याची शक्यता

चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही-पवनपार  (Gunjewahi-Pawanpar area) परिसरातील हि घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेंदुपत्ता तोडण्यासाठी 13 महिला जंगलात गेल्या असताना यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून वाघाच्या हल्ल्यात एकाच वेळी चार महिलांच्या मृत्यूची जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील ही पहिली घटना असण्याची शक्यता वर्तवली झालेत आहे. मात्र या हल्ल्यामागील कारणांमुळे वाढत्या तपमानाचा वन्यजिवांनाही फटका बसत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाघाच्या हल्ल्याची ही घटना गुंजेवाही-पवनपार या मार्गावर असलेल्या खैरीचक परिसरातील जंगलात घडली असून सर्व महिला या गुंजेवाही या गावातील रहिवासी आहेत्या सर्व महिला भट्टी मोहल्ला वॉर्ड क्रमांक 1 येथे राहतात. तर मृतांची नावे खालील प्रमाणे आहेत

1) कविता दादाजी मोहुर्ले - 45

2) अनिता दादाजी मोहुर्ले - 46

3) संगीता संतोष चौधरी - 40

4) सुनीता कौशिक मोहुर्ले - 35

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.