हा विक्रम एका अशा चित्रपटाच्या नावावर आहे, जो अजूनही थिएटरमध्ये जबरदस्त कामगिरी करत असून त्याने आधीच बजेटच्या 100 पट कमाई करत सर्वांनाच थक्क केलं आहे. लेखक-दिग्दर्शक करी बार्कर यांचा हा हॉरर चित्रपट असून त्याचं नाव ‘ऑब्सेशन’ असं आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रत्येक आठवड्याला छप्परफाड कमाई करतोय.
बेअर हा एका म्युझिक स्टोअरमध्ये काम करणारा कर्मचारी असतो. तो एकदा एक अजब खेळणं विकत घेतो, जो त्याची बालमैत्रीण निक्की (इंटे नॅव्हारेट) त्याच्या प्रेमात पडावी, ही त्याची इच्छा पूर्ण करतं. मात्र नंतर त्याचे परिणाम खूप भयंकर असतात. 15 मे रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.