ENGW vs INDW 1st T20i Toss : इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाची बॅटिंग, पहिल्याच सामन्यात कॅप्टन बदलला, पाहा प्लेइंग ईलेव्हन
Tv9 Marathi May 29, 2026 03:45 AM

इंग्लंड वुमन्स विरुद्ध इंडिया वुमन्स यांच्यातील 4 सामन्यांच्या टी 20i मालिकेला आज 28 मे पासून श्रीगणेशा होत आहे. मालिकेतील सलामीच्या सामन्याचं आयोजन हे चेम्सफोर्डमधील काउंट्री ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 10 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. टीम इंडियाची इंग्लंडमध्ये टी 20i क्रिकेटमध्ये 2022 पासून टॉस गमावण्याची ही दहावी वेळ ठरली. इंग्लंडची कॅप्टन शार्लट डीन हीने फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे आता टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध किती धावा करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळालीय? हे जाणून घेऊयात.

पहिल्याच सामन्यात कॅप्टन बदलला

टीम इंडियाने इंग्लंड विरूद्धच्या सलामीच्या सामन्यातच कॅप्टन बदलला आहे. नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर हीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे हरमनप्रीतच्या जागी उपकर्णधार स्मृती मंधाना हीच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी आहे. हरमनप्रीत का खेळत नाहीय? या प्रश्नावर स्मृतीने काळजी करण्यासारखं काहीच कारण नसल्याचं म्हटलं. त्यामुळे हरमनप्रीतला कोणतीही दुखापत नसल्याचं स्पष्ट झालंय.

टिली कोर्टीन-कोलमॅनचं पदार्पण

इंग्लंडकडून युवा खेळाडूचं पदार्पण झालं आहे. टीम मॅनेजमेंटने 18 वर्षीय टिली कोर्टीन-कोलमॅन हीला टी 20i पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता ही युवा खेळाडू पाहुण्या टीम इंडिया विरुद्ध कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच हेदर नाईट या सामन्यासाठी मैदानात उतरताच इतिहास घडवणार आहे. हेदर इंग्लंडसाठी सर्वाधिक सामने खेळणारी खेळाडू ठरणार आहे.

नंदीनी शर्माचं टी 20i पदार्पण

तसेच टीम इंडियाकडून नंदीनी शर्मा हीचं टी 20i पदार्पण झालं आहे. नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर हीने नंदीनला टीम इंडियाची कॅप दिली. तसेच हरमनप्रीत आणि इतर सहकाऱ्यांनी नंदीनीचं टी 20i संघात स्वागत करण्यासह पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

वुमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: स्मृती मंधाना (कर्णधार), शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमा रॉड्रिग्ज, भारती फुलमाळी, ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, नंदिनी शर्मा आणि श्री चरणी.

इंग्लंड वुमन्स प्लेइंग ईलेव्हन: सोफिया डंकली, ॲलिस कॅप्सी, एमी जोन्स (विकेटकीपर), हेदर नाईट, फ्रेया केम्प, डॅनिएल गिब्सन, शार्लट डीन (कर्णधार), इसी वोंग, सोफी एक्लस्टोन, लॉरेन बेल आणि टिली कोर्टीन-कोलमॅन.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.