'मैंने प्यार किया'मध्ये सलमान खान ऐवजी दिसला असता 'हा' प्रसिद्ध खलनायक; पण ऐनवेळी नियतीनं डाव टाकला अन् भाईजान चमकला
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क June 04, 2026 09:43 AM

Salman Khan Was Not First Choice For Maine Pyar Kiya: दिवंगत बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता फराज खान (Bollywood Actor Faraaz Khan) यानं 1990 च्या दशकात आपल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वानं आणि अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलेलं. फारच कमी लोकांना माहीत आहे की, 'मैंने प्यार किया' या सुपरहिट सिनेमासाठी फराज खान (Faraaz Khan) यांनाच मूळ पसंती होती. मात्र, अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्याला हा प्रोजेक्ट स्विकारता आला नाही. त्यानंतर ही संधी सलमान खान (Salman Khan) याच्याकडे गेली. महत्त्वाची बाब म्हणजे, अनेक वर्षांनंतर, जेव्हा फराज खान मृत्यूशी झुंज देत होता, तेव्हा त्याला मदतीचा हात देण्यासाठी स्वतः सलमान खानच पुढे आला होता.

'मैंने प्यार किया'साठी सलमान खानला पहिली पसंती नव्हतीच...

फराज खानचा जन्म 27 मे 1970 रोजी मुंबईत (Mumbai News) झालेला. तो अभिनेता युसूफ खान (Actor Yusuf Khan) यांचा थोरला मुलगा होता. त्याचे वडील सिनेसृष्टीत 'जिबिस्को' या नावानं ओळखलं जात असत आणि त्यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारल्या होत्या. अगदी बालपणापासूनच फराज खान यानं सिनेसृष्टीत प्रवेश करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा तेव्हा आला, जेव्हा दिग्दर्शक सूरज बडजात्या (Director Sooraj Barjatya) हे त्यांच्या 'मैंने प्यार किया' (Maine Pyar Kiya) या सिनेमासाठी एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होते. 

25 years of Maine Pyar Kiya: Lesser known facts about the film - India Today

ऑडिशन्समध्ये फराजनं सलमान खानलाही टाकलेलं मागे 

'मैंने प्यार किया'च्या ऑडिशन्ससाठी अनेक तरुण उपस्थित राहिले होते, यामध्ये सलमान खान आणि दीपक तिजोरी यांसारख्या नावाजलेल्या नावांचाही समावेश होता. मात्र, असं म्हटलं जातं की, सूरज बडजात्या हे फराज खानच्या अभिनयानं सर्वाधिक प्रभावित झाले होते आणि या भूमिकेसाठी त्याची निवड जवळपास निश्चित झाली होती. तरीही, सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होण्याच्या अगदी काही काळ आधीच फराज खान आजारी पडला. त्याला कावीळ (Jaundice) झाली आणि त्यावर दीर्घकाळ उपचार करणं आवश्यक असल्यानं, त्याला या सिनेमात सहभागी होता आलं नाही. परिणामी, ही भूमिका सलमान खानच्या वाट्याला आली, आणि त्या क्षणापासून त्याच्या कारकिर्दीनं गरुडझेप घेतली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by BollywoodNow (@bollywoodnow)

1996 मध्ये फराज खानचा बॉलिवूड डेब्यू (Faraz Khan Bollywood Debut)

फराज खाननं अखेर 1996 मध्ये 'फरेब' सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात त्यानं सुमन रंगनाथन आणि मिलिंद गुणाजी यांच्यासोबत स्क्रिन शेअर केलेली. या सिनेमातील 'तेरी आँखे झुकी झुकी' हे गाणं प्रचंड गाजलं. त्यानंतर 'पृथ्वी' सिनेमात तो सुनील शेट्टीसोबत पडद्यावर झळकला. 

1998 मधील 'मेहंदी' सिनेमानं फराज खानला मोठी ओळख मिळवून दिली. या सिनेमात त्यानं राणी मुखर्जीसोबत काम केलं होतं. या सिनेमात फराज खाननं एका नराधम पतीची भूमिका साकारलेली. या सिनेमाची कथा एका सामाजिक समस्येवर, विशेषतः हुंडा पद्धतीवर आधारित होती आणि त्या काळात त्यावर बरीच चर्चा झाली होती. मात्र, या सिनेमामुळे मिळालेल्या प्रसिद्धीचे फराजच्या कारकिर्दीसाठी कोणतेही ठोस फायदे झाले नाहीत.

त्यानंतर, फराज खाननं 'दुल्हन बनू मैं तेरी', 'दिल ने फिर याद किया' आणि 'चांद बुझ गया' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं. पण, यापैकी कोणत्याही सिनेमाला मोठं व्यावसायिक यश मिळालं नाही. हळूहळू, त्याला मिळणाऱ्या सिनेमांच्या संधी कमी होऊ लागल्या. त्यानंतर त्यानं आपलं लक्ष टेलिव्हिजन इंडस्ट्रीकडे वळवलं आणि 'लिपस्टिक', 'अचानक 37 साल बाद' आणि 'Ssssh... कोई है' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं.

Latest and Breaking News on NDTV

2020 मध्येच जगाचा घेतला निरोप 

2020 मध्ये, फराज खानची प्रकृती खालावू लागली. अभिनेता न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आणि छातीच्या संसर्गाशी लढा देत होता. बंगळुरू इथल्या एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांतच अभिनेत्याची प्रकृती एवढी खालावलेली की, त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेले. त्याच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च भागवण्यासाठी त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची आवश्यकता होती. त्यावेळी, पूजा भट्ट हिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना मदतीचं आवाहन केलेलं. त्यानंतर, सलमान खान मदतीसाठी पुढे आला आणि त्यानं फराज खानच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च उचलला. काश्मिरा शाह हिनं याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन शेअर केलेली. दरम्यान, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुनही फराज खान याला वाचवता आलं नाही. 4 नोव्हेंबर 2020 रोजी त्याचं निधन झालं. 

Satish Sanpal Dubai Billionaire Success Story: बुर्ज खलीफामध्ये घर, बायकोकडे 40 किलो सोनं, एक वर्षाच्या मुलीसाठी कस्टमाइज्ड रॉल्स-रॉयस अन्...; दुबईत अब्जावधींचं साम्राज्य उभारणारा सतीश सनपाल कोण?

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.