'होणार सून मी ह्या घरची' मधून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय मराठी अभिनेता शशांक केतकर याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. हे मन बावरे' मधील त्याचं पात्रही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. सध्या शशांक 'मुरांबा' या मालिकेत दिसतोय. शशांकला दोन मुलं आहेत. त्याच्या मोठ्या मुलाचं नाव ऋग्वेद आहे आणि मुलीचं नाव राधा आहे. ऋग्वेदने एकदा त्याच्या मालिकेच्या सीन वरून त्याच्या बाबाला चक्क ताकीद दिली होती. ज्यामुळे शशांकने प्रोडक्शनकडे स्क्रिप्ट बदलण्याची विनंती केलेली. असं काय म्हणालेला ऋग्वेद?
शशांकने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला, 'आपण जे काही स्क्रिनवर दाखवतो त्याचा लहान मुलांवर परिणाम होतो. जोपर्यंत मला मुलं नव्हती तोपर्यंत ज्या तळटिपा येतात की हे फक्त काल्पनिक आहे वगैरे वगैरे आणि जे आपण हसण्यावारी घेतो की अरे बंद करा, हे कशाला दाखवता. पण याचा परिणाम होतो आणि हे मी अनुभवतोय मला मुलं झाल्यानंतर. लहान मुलं या वयातील आणि याच्या पुढची मुलं या बाबतीत भयंकर क्युरियस आहेत. त्यांना आताच यापासून लांब नाही नेलं, त्यावर आळा नाही घातला तर पुढची पिढी बिघडायला वेळ लागणार नाही.'
तो पुढे म्हणाला, 'मुलं खूप सीरियस होतात. मुरांबा मालिकेत आम्ही लीप घेतला तेव्हा आम्हाला एक मुलगी आहे असं दाखवण्यात आलं. स्क्रिप्टमध्ये असं लिहून आलं की त्या मुलीचं राधा असं असतं. त्यामुळे मला चॅनेलला सांगावं लागलं की राधा नाव ठेवू नका त्यामुळे ऋग्वेद दुखावेल. त्याचं असं होईल की बाबा राधा राधा म्हणून त्या एका मुलीला कडेवर घेतो. ऋग्वेद नावाचं कोणीच नाहीये त्याच्याकडे. कारण त्याने मला हे बोलून दाखवलं. मग तिचं नाव आरोही केलं. पोस्टरमध्ये मी तिला कडेवर घेतलं आहे आणि तिचे लाड करताना दिसतो. तो मला म्हणायचा, बाबा सगळं ठीक आहे पण ते पोस्टर बदलायला सांग. तू का तिला कडेवर घेतलं आहेस. ती नाहीये तुझी खरी मुलगी मग तू तिला का घेतोस कडेवर.'
View this post on InstagramA post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)
"तो इतका जेलस होतोय आणि ही जेलसी इथपर्यंत आहे की माझ्याबरोबर कोणी फोटो काढत असेल त्याला असं वाटतं की बाबा घेऊन कोणी तरी पळेल. कारण तो सकाळी 8 ला जातो रात्री 11 येतो. तो मला दिवसभर मिळत नाही. मग आता हे लोक याच्याशी बोलतात ते त्याला घेऊन गेले तर. तो घाबरतो. मला म्हणतो बाबा आता तू शूटिंग करत नाहीस ना मग फोटोपण नाही काढायचे. मग तो कधी कधी रडतो की तू कोणाबरोबर फोटो का काढलास. मग त्याला समजावं लागतं. आता त्याला सगळं कळायला लागलंय, आता तो शांत होतो. आता राधाही ही फेज येईल. पण कदाचित तोच तिला समजावेल.'
'मी अक्षय हे पात्र करतोय तो शशांक नाही, हे त्याला समजावं लागलं. कार्टून फिल्मही खोटं खोटं असतं. आता ते त्याला इतकं फिक्स झालं की, आता तो मला विचारतो की हे सगळं खोटं आहे ना. आता ते सोपं झालं आहे. पण तरीही काळजी घ्यावी लागते. कारण त्यांची क्युरिओसिटी खूप आहे.'
लव्ह मॅरेज करतेयस जर काही चुकीचं झालं तर... लग्नाच्या एक दिवस आधी प्रिया बापटला आई असं काही म्हणालेली की