मुलाच्या निधनाने तुटून गेले होते नाना पाटेकर; नक्की काय घडलेलं?
esakal June 06, 2026 11:45 AM

NANA PATEKAR SIMPLE LIFESTYLE DESPITE WEALTH: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यांच्या अभिनयाच्या करिअरमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. पडद्यावर कठोर आणि दमदार भूमिका करणाऱ्या नाना पाटेकरच्या आयुष्यात मात्र अनेक भावनिक चढ-उतार आले. त्यांच्या पहिल्या मुलाच्या निधनानं ते जास्त खचले होते. तो त्यांच्यासाठी मोठा धक्का होता.

नाना पाटेकर यांनी १९७८ मध्ये निलकांती पाटेकर यांच्याशी विवाह केला होता. लग्नानंतर त्यांना काही काळातच पुत्ररत्न प्राप्त झालं. पंरतु मुलाला जन्मत: काही आयोग्यविषयक समस्या जाणवू लागल्या. सुरुवातीला नाना पाटेकर मानसिकदृष्ट्या अस्वस्थ वाटत होते. परंतु कालांतरानं त्यांचं मुलावर खूप प्रेम जडलं.

अडीच वर्षाचा असताना त्यांच्या मुलाचं निधन झालं. त्याच्या जाण्याने नाना पाटेकर पूर्णपणे खचून गेले होते. त्यांनी विविध मुलाखतींमध्ये मुलाच्या जाण्याबाबत उल्लेख केला होता. त्यांना धक्क्यातून बाहेर येण्यासाठी मानसिक संघर्षाचा सामना करावा लागल्याचंही बोललं जातं.

View this post on Instagram