Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्गासाठी सुरू असलेले सर्वेक्षण म्हणजे सक्ती नसून तो अंतिम आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतरच प्रस्ताव लोकप्रतिनिधींसमोर मांडला जाईल आणि त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट मत पर्यटन व खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शक्तिपीठ महामार्गाबाबतची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी त्यांनी पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह) आणि खनिज उत्खननासंदर्भातही महत्त्वाची माहिती दिली. जिल्ह्यातील बहुतांश गावे इको सेन्सिटिव्ह क्षेत्रात असल्याने खनिज उत्खननावर अनेक मर्यादा आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील १३ गावे या क्षेत्रातून वगळावीत, असा प्रस्ताव केंद्र सरकारच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्र समितीकडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वी उत्खनन करून पडून राहिलेल्या खनिजाचा पुन्हा वापर करता यावा यासाठी ‘डंपिंग रिव्हाईज पॉलिसी’ विचाराधीन असून तिचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहितीही त्यांनी दिली. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील बहुतांश विकासकामे पूर्ण झाली असून काही प्रलंबित कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित असल्याचा दावा करत शंभुराज देसाई यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. आमच्यासमोर टिकाव लागणार नाही हे लक्षात आल्यानंतरच महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याचा टोला त्यांनी लगावला.
Chhatrapati Sambhaji Maharaj Budhbhushanam : धर्मो रक्षति रक्षितः, छत्रपती संभाजी महाराजांचा 'बुधभूषणम्' काव्य जाणून घ्यालाडकी बहीण योजनेबाबत बोलताना, निकषाबाहेर जाऊन नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आली असून पात्र महिलांना कोणत्याही परिस्थितीत लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच अपात्र ठरलेल्या महिलांकडून यापूर्वी मिळालेली रक्कम परत घेतली जाणार नसल्याचेही शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केले.