World Yogasana Championships: भारताची सुवर्णपदकांची 'पंचमी'; महाराष्ट्राच्या ज्योती देऊरकरने गोल्ड मेडलसह उमटवला ठसा
esakal June 06, 2026 11:45 AM

यजमान भारताच्या खेळाडूंनी विश्व योगासन अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला. भारतीय खेळाडूंनी सहापैकी पाच प्रकारांमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली. महाराष्ट्राच्या ज्योती देऊरकर हिनेही ट्विस्टिंग बॉडी इंडिव्हिज्युअल या प्रकारात सुवर्णपदक पटकावत आपला ठसा उमटवला.

Summer Yoga Tips : नैसर्गिकरीत्या शरीर ठेवा कूल! उन्हाळ्यातील उष्णतेवर मात करण्यासाठी रोज करा 'ही' योगासने; जाणून घ्या पद्धत

पश्चिम बंगालच्या अभय बर्मन (वरिष्ठ पुरुष) आणि ऋतु मंडल (वरिष्ठ महिला) यांनी पारंपरिक योगासन प्रकारात सुवर्णपदके जिंकून भारताच्या यशस्वी मोहिमेची सुरुवात केली. उत्साही प्रेक्षकांच्या उपस्थितीत भारतीय संघाने त्यानंतरही शानदार कामगिरी कायम ठेवली.

अभय बर्मनने ६३.४२ गुणांसह विश्व योगासन अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचे पहिले सुवर्णपदक पटकावले. इंडोनेशियाच्या अरकान रियांतो (५७.२३) याने रौप्यपदक जिंकले, तर उझबेकिस्तानच्या ॲलन (५३.२१) याने ब्राँझपदकावर हक्क सांगितला. ऋतु मंडलने वरिष्ठ महिला गटात ६४.३३ गुणांसह भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले. कझाकस्तानच्या ऐझान कुआनिशबायेवा (५८.९७) हिने रौप्यपदक, तर हाँगकाँगच्या लॅम मॅन (५६.९८) हिने ब्राँझपदकाची माळ गळ्यात घातली.

भारताच्या ऋतु ठाकूर हिने वरिष्ठ अ महिला गटात ६३.५० गुणांसह सुवर्णपदक आपल्या नावावर केले. अर्जेंटिनाच्या नबिला सोल बाराझा (६२.०४) हिला रौप्यपदक मिळाले, तर केनियाच्या अवूर साउलिन्हा हिने ब्राँझपदकावर शिक्कामोर्तब केला. रोशन थापा याने वरिष्ठ ब पुरुष गटात ६५.६७ गुणांसह भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक जमा केले.

Yoga Competition: राज्यातील योगपटूंची चंदीगडमध्ये चमकदार कामगिरी.! एका सुवर्णपदकासह 15 पदकांची लयलूट.. निकाल पारंपरिक योगासन

वरिष्ठ पुरुष :

  • सुवर्ण – अभय बर्मन (भारत) ६३.४२

  • रौप्य – अरकान रियांतो (इंडोनेशिया) ५७.२३

  • कांस्य – अॅलन (उझबेकिस्तान) ५३.२१

वरिष्ठ महिला :

  • सुवर्ण – ऋतु मंडल (भारत) ६४.३३

  • रौप्य – ऐझान कुआनिशबायेवा (कझाकस्तान) ५८.९७

  • कांस्य – लॅम ङा मॅन (हाँगकाँग) ५६.९८

वरिष्ठ अ पुरुष :

  • सुवर्ण – नॅथॅनिएल टॅन लिओंग आन (सिंगापूर) ५५.३७

  • रौप्य – करीमु स्वाफी (टांझानिया) ५४.९९

  • कांस्य – सुमिर ग्नावली (भारत) ५४.००

वरिष्ठ अ महिला :

  • सुवर्ण – ऋतु ठाकूर (भारत) ६३.५०

  • रौप्य – नबिला सोल बाराझा (अर्जेंटिना) ६२.०४

  • कांस्य – अवूर साउलिन्हा (केनिया) ५३.८६

वरिष्ठ ब पुरुष :

  • सुवर्ण – रोशन थापा (भारत) ६५.६७

  • रौप्य – एमडी मामून खान बाबू (बांगलादेश) ५८.५७

  • कांस्य – दानिल रायकोव्ह (किर्गिझस्तान) ५३.५५

ट्विस्टिंग बॉडी इंडिव्हिज्युअल

वरिष्ठ ब महिला :

  • सुवर्ण – ज्योती देऊरकर (भारत) ४६.१४

  • रौप्य – ओलिमुथू नवामणी (ओमान) ३८.६६

  • कांस्य – साओरी क्युएई (जपान) ३८.४१

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.