कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांचं थोड्याच वेळात दिल्ली विमानतळावर आगमन होणार आहे. त्यांनी आज दिल्लीतील जंतर मंतर इथे आंदोलनाची हाक दिली आहे. नीट आणि अन्य परिक्षांवरुन झालेल्या गोंधळावरुन कॉकरोच जनता पार्टीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जंतरमंतर इथे मोठं आंदोलन करण्याची त्यांनी तयारी केली आहे. दीपके यांनी शांततेत तरुणांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे.NEET, CUET इत्यादी राष्ट्रीय परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांमुळे ते केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. नीट परीक्षांमधील पारदर्शकतेची त्यांनी मागणी केली आहे. शिक्षणासाठी गेलेले अभिजीत दीपके हे आज दिल्लीत दाखल होत आहेत. त्यामुळे मोठी गर्दी अपेक्षित आहे. तरुणांना रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.
कॉकरोच जनता पार्टीचं जंतर-मंतर वरील हे पहिलं आंदोलन आहे. पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके सकाळी 8 वाजता अमेरिकेतून दिल्लीत दाखल होतील. आंदोलन सुरु करण्याआधी पोलिसांची आवश्यक परवानगी आणि औपचारिक प्रक्रिया पूर्ण करतील. सकाळी 9 वाजल्यापासून आंदोलन सुरु करण्याची योजना आहे. CJP चे सोशल मीडिया प्लेटफॉर्म इन्स्टाग्राम वर 2 कोटीपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. त्या तुलनेत आजच्या प्रदर्शनात किती लोक सहभागी होतात, याची उत्सुक्ता आहे. देशातील शिक्षण व्यवस्थेने एक कोटीपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना निराश केलय असं या पार्टीचं म्हणणं आहे. कॉकरोच जनता पार्टीचं नीट पेपर लीकचा मुद्दा उचलला आहे. त्याशिवाय CBSE परीक्षा आणि OSM सारख्या मुद्यांवरही चिंता व्यक्त केली आहे.
(बातमी अपडेट होत आहे)