IND vs AFG : टीम इंडियाच्या नावावर सलग दुसरा दिवस, अफगाणिस्तान 451 धावांनी पिछाडीवर
GH News June 07, 2026 09:11 PM

अफसर झझाई आऊट होताच टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. टीम इंडियाने यासह सलग दुसरा दिवस आपल्या नावावर केला आहे. भारताने या कसोटीवर घट्ट पकड मिळवली आहे. मानव सुथार याने आपल्या बॉलिंगवर अफसरला कॅच आऊट केलं. यासह अफगाणिस्तानने पाचवी विकेट गमावली. अफगाणिस्तानने खेळ संपेपर्यंत 564 च्या प्रत्युत्तरात 5 विकेट्स गमावून 39.5 ओव्हरमध्ये 113 रन्स केल्या. त्यामुळे अफगाणिस्तान अजूनही 451 धावांनी पिछाडीवर आहे. रहमत शाह हा 43 धावा करुन नाबाद परतला. तर टीम इंडियासाठी डेब्युटंट मानव सुथार याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

दुसऱ्या दिवसाचा खेळ, भारताचा पहिला डाव घोषित

कॅप्टन शुबमन गिल आणि ऋषभ कॅप्टन या दोघांनी दुसऱ्या दिवसाचा खेळाला 3 आऊट 368 (85 ओव्हर) रन्सपासून सुरुवात केली. टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी 5 विकेट्सच्या मोबदल्यात 196 धावा जोडल्या. टीम इंडियाने 127 ओव्हरमध्ये 8 आऊट 564 धावांवर डाव घोषित केला. टीम इंडियासाठी दोघांनी शतक तर तिघांनी 50 पेक्षा अधिक धावा केल्या.

दोघांचं शतक, तिघांचं अर्धशतक

कॅप्टन शुबमन गिल याने सर्वाधिक 126 धावा केल्या. तर केएल राहुल याने 100 धावांचं योगदान दिलं. साई सुदर्शन आणि ऋषभ पंत या दोघांनी प्रत्येकी 81-81 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर याने नाबाद 52 धावांचं योगदान दिलं. तसेच इतरांनीही छोटेखानी खेळी करत आपली भूमिका बजावली. अफगाणिस्तानसाठी मोहम्मद सलीम साफी याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. तर झियाउर रहमान शरफी आणि कॅप्टन हशमतुल्लाह शाहीदी या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

डेब्युटंट मानव सुथारची दुसऱ्या दिवशी उल्लेखनीय कामगिरी

अफगाणिस्तानची बॅटिंग

अफगाणिस्तानच्या पहिल्या 2 फलंदाजांना ठिकठाक सुरुवात मिळाली. मात्र भारतीय गोलंदाजांनी त्यांना वेळीच आऊट केलं. अब्दुल मलिक याने 16, सेदीकुल्लाह अटल याने 17 तर रहमानुल्लाह गुरुबाज याने 12 धावांचं योगदान दिलं. हशमतुल्लाह शाहीदी याने 20 धावांचं योगदान दिलं. तर मानव सुथार याने अफसर झझाई याला 40 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर कॅच आऊट केलं. यासह दुसऱ्या दिवसाचं पॅकअप झालं. रहमत शाह 81 बॉलमध्ये 6 फोर आणि 1 सिक्ससह नॉट आऊट 43 रन्स केल्या. टीम इंडियासाठी मानव सुथार याने 3 आणि प्रसिध कृष्णा याने 2 विकेट्स घेतल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.