पुणे: पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आतापर्यंत १ हजार ८३७ एकर जागेचे शेतकऱ्यांनी प्रतिज्ञापत्र (संमतीपत्र) जिल्हा प्रशासनाकडे सादर केले आहे. विमानतळासाठी भूसंपादन करावयाच्या एकूण क्षेत्रापैकी जवळपास ६० टक्क्यांहून अधिक जागा जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात आली आहे, तर आतापर्यंत ९०० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. भूसंपादनासाठी संमतीपत्रे देण्याची अंतिम मुदत दोन दिवसांत संपुष्टात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Cycling Story: ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; सहा वेळा सायकलवरून पंढरपूर वारी, आजही विनाऔषध तंदुरुस्तविमानतळासाठी ७ मे पासून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. सुमारे ३ हजार एकर जागेचे संपादन करण्यात येणार आहे. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाल्यापासून एक महिन्यात १ हजार ८३७ एकर क्षेत्राची संमतीपत्रे जिल्हा प्रशासनाकडे शेतकऱ्यांनी सादर केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. त्यामुळे विमानतळासाठी आवश्यक असलेले क्षेत्रापैकी निम्म्याहून अधिक क्षेत्र संपादित झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील एकूण १ हजार २१६ हेक्टर (तीन हजार एकर) क्षेत्र संपादित करण्यात येत आहे. जमीन मोजणीवेळी सुमारे ९६ टक्के शेतकऱ्यांनी संमती दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने प्रति एकर एक कोटी ६१ लाख रुपये मोबदल्याची रक्कम निश्चित करून दिली आहे. भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सुमारे ६ हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यासाठी ‘एमआयडीसी’ने हुडकोकडून कर्ज उचलले आहे. त्याचा पहिला पाचशे कोटी रुपयांचा हप्ता जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता.
भूसंपादन प्रत्यक्षात सुरू झाल्यापासून आजपर्यंत सुमारे ९०० कोटी रुपयांच्या मोबदल्याचे वाटप शेतकऱ्यांना झाले आहे. मोबदल्याचे वाटप करताना रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असल्याने शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढत चालला आहे.
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांमध्ये मोबदल्यासंदर्भात वाद आहेत, अशा शेतकऱ्यांची प्रकरणे सामंजस्याने सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यात येत आहे. जेणेकरून ही प्रकरणे न्यायालयात न जाता परस्पर संमतीने सोडवण्यात आल्यास शेतकऱ्यांना तत्काळ रक्कम मिळू शकणार आहे. यासाठी देखील जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे, असेही ते म्हणाले.
Success Story: अंगणवाडी सेविकेच्या तिन्ही मुलांची सरकारी सेवेत भरारी; एक मंत्रालयात, दोघे मुंबई पोलिसांत, शेतकरी कुटुंबाची प्रेरणादायी यशोगाथागावाचे नाव संमती दिलेल्या
शेतकऱ्यांची संख्या संमती मिळालेले क्षेत्र (हे. आर)
वनपुरी २६५ ११८.४५
उदाचीवाडी ५९ ४२.००
कुंभारवळण २५० ११२.००
पारगाव ५८० १००.४२
एखतपूर २९८ १४६.५०
खानवडी २६० १५०.८८
मुंजवडी १७५ ६५.००