Weight Loss Breakfast Recipes: वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात, पण सकाळच्या नाश्त्यात काय खावं हा प्रश्न पडतोय? रोज तेच पोहे, उपमा किंवा बेसनाचा चिला खाऊन कंटाळा आला असेल, तर हा पोह्यांचा चिला तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. पोहे, रवा आणि ताज्या भाज्यांपासून बनणारा हा चिला चविष्ट तर आहेच, शिवाय पोटही बराच वेळ भरलेलं ठेवतो. कमी साहित्य आणि कमी वेळेत तयार होणारी ही रेसिपी तुमच्या हेल्दी ब्रेकफास्ट मेनूमध्ये नक्कीच स्थान मिळवू शकते.
साहित्य1 कप पोहे
1/2 कप रवा
1 टीस्पून दही
1/2 कांदा (बारीक चिरलेला)
1/2 टोमॅटो (बारीक चिरलेला)
1/2 टीस्पून मोहरी
कढीपत्त्याची 1 काठी
चवीनुसार मीठ
1/4 टीस्पून काळी मिरी पावडर
1 टेबलस्पून कोथिंबीर
आवश्यकतेनुसार पाणी
- पोहे मिक्सरमध्ये घालून जाडसर वाटून घ्या.
- हे वाटलेले पोहे एका भांड्यात काढा.
- त्यात रवा, दही आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण तयार करा.
- कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून मिश्रणात घाला.
- त्यात मीठ, काळी मिरी पावडर आणि कोथिंबीर घालून नीट मिसळा.
- एका छोट्या पॅनमध्ये थोडे तेल गरम करून मोहरी आणि कढीपत्ता घालून फोडणी तयार करा. ही फोडणी मिश्रणात मिसळा.
- तवा गरम करून त्यावर थोडे तेल लावा. तयार मिश्रणाचा चिला पसरवा आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
- गरमागरम पोह्यांचा चिला हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
Weekend Special Breakfast : वीकेंडला 10 मिनिटांत बनवा झटपट, हेल्दी आणि जबरदस्त टेस्टी ओट्स उत्तप्पम!