*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार
☀️ सूर्योदय – ०६:००
☀️ सूर्यास्त – १९:०४
चंद्रोदय – २४:५९
⭐ प्रात: संध्या – ०४:४८ ते ०६:००
⭐ सायं संध्या – १९:०४ ते २०:१६
⭐ अपराण्हकाळ – १३:५० ते १६:२७
⭐ प्रदोषकाळ – १९:०४ ते २१:१५
⭐ निशीथ काळ – ००:१० ते ००:५३
⭐ राहु काळ – ०७:३८ ते ०९:१६
⭐ यमघंट काळ – १०:५४ ते १२:३२
♦️ लाभदायक----
लाभ मुहूर्त– १५:४८ ते १७:२६
अमृत मुहूर्त– ०६:०० ते ०७:३८
विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३४
⏳ कार्यसिद्धी वेळा – ०९:२९ ते १०:५४ | १३:५० ते १९:०४ | २३:२६ ते २४:००
⚠️ कार्यनाशक वेळा – ०६:०० ते ०९:२९ | ११:१३ ते १३:५० | १९:०४ ते २३:२६
मुंबई बंदर भरती/ओहोटी – भरती: ००:२९ ते ०६:२८ | ओहोटी: ०६:२८ ते १२:३० | भरती: १२:३० ते १८:४९ | ओहोटी: १८:४९ ते ०१:०४ पुढील दिवस
ग्रहमुखात आहुती – राहु (अशुभ) १२:५८ नं. गुरु (शुभ) ०४:२८ नं. पुढील दिवस राहु (अशुभ)
अग्निवास – पाताळी २१:५४ पर्यंत नंतर पृथ्वीवर
️ शिववास – २१:५४ पर्यंत गौरीसन्निध असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे त्यानंतर सभेत असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे
शालिवाहन शक १९४८
संवत्सर पराभव
अयन – उत्तरायण
ऋतु – ग्रीष्म
मास – अधिक ज्येष्ठ
पक्ष - कृष्ण पक्ष
तिथी – अष्टमी (२१:५४ नं.) नवमी
वार – सोमवार
नक्षत्र – पूर्वाभाद्रपदा (२८:२८ नं.) उत्तराभाद्रपदा
योग – प्रीति (२७:२५ नं.) आयुष्मान
करण – बालव (१०:११ नं.) कौलव
चंद्र रास – कुंभ (२२:२८ नं. मीन)
सूर्य रास – वृषभ
गुरु रास – कर्क
दिनविशेष – कालाष्टमी, सूर्याचा मृग नक्षत्र प्रवेश दु.१२.५८
विशेषआपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्या हातून घडणाऱ्या बऱ्या-वाईट कर्मांचा हिशेब आपल्या खात्यावर जमा होत राहतो. आणि त्यातून जमा होणाऱ्या पाप-पुण्याची फळे भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो असे हिंदू धर्मातील तत्वज्ञान सांगते. असा पुनर्जन्म खरोखर मिळतो का? मिळाल्यास कोणत्या ठिकाणी, कोणत्या अवस्थेत मिळतो अशा शंका सामान्यतः प्रत्येकाच्या मनात उद्भवतात.
पुनर्जन्माविषयी भारतामध्ये प्राचीन काळापासून अनेक ग्रंथांमध्ये विविध अभ्यासकांनी आपली निरीक्षणे नोंदवली आहेत. अलीकडे तर पाश्चात्य जगातही अनेक तज्ज्ञांनी या विषयामध्ये सखोल अभ्यास करून त्याविषयी ग्रंथनिर्मिती केलेली दिसते. पुनर्जन्म ही एक अंधश्रद्धा आहे असं म्हणणारा एक वर्ग आणि दुसरीकडे या संकल्पनेला पुष्टी देणाऱ्या इतिहासातील काही वैशिष्ट्यपूर्ण घटना यांचा परामर्श घेऊन सविस्तर माहिती सांगणारा हा व्हिडिओ आम्ही घेऊन आलो आहोत. जाणून घेऊ या पुनर्जन्माचं रहस्य श्री. गौरव देशपांडे
https://youtu.be/M4yZN8XVKUw?si=ModnNsG-JHF7LYR-
शुभाशुभ दिवस - शुभ दिवस
श्राद्ध तिथी - अष्टमी श्राद्ध
आजचे वस्त्र – पांढरे
स्नान विशेष – वाळा, शिरस, केशर, रक्तचंदन यापैकी कोणतेही पाण्यात टाकून स्नान करावे.
उपासना – चंद्र कवच स्तोत्राचे पठण व ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा.
दान – सत्पात्री व्यक्तीस तांदूळ, कापूर, मोती, श्वेतवस्त्र, घृताने भरलेला कुंभ दान करावे
तिथीनुसार वर्ज्य – नारळ, खोबरं, मांस, स्त्रीसंग
दिशाशूल उपाय – दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा करण्यापूर्वी दूध पिऊन बाहेर पडावे.
चंद्रबळ – मेष , वृषभ , सिंह , कन्या , धनु , कुंभ — या राशींना २२:२८ पर्यंत चंद्रबळ अनुकूल आहे.
चंद्रबळ (पुढे) – वृषभ , मिथुन , कन्या , तुळ , मकर , मीन — या राशींना २२:२८ नंतर चंद्रबळ अनुकूल आहे