भूकंपाने हादरली जमीन, त्सुनामीचे संकट, 7.8 चा शक्तिशाली भूकंप, तब्बल 3 तास..
GH News June 08, 2026 11:10 AM

फिलीपिन्समध्ये मोठा भूकंप झाला. दक्षिण फिलीपिन्सच्या मिंडानाओ प्रदेशात 7.8 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाची नोंद झाली. ज्यामुळे नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस (GFZ) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू फिलीपिन्सच्या बुरियास शहरापासून 24,7 किलोमीटर आहे. हा भूकंप जमिनीखाली सुमारे 35 किलोमीटर खोलीवर झाला. हा भूकंप स्थानिक वेळेनुसार सकाळी 7.37 वाजता झाला. या भूकंपामुळे मोठी खळबळ उडाली. काही लोक गाड झोपेतच असताना हा भूकंप झाला. या भूकंपानंतर मोठे नुकसान झाले. काही इमारतीही कोसळल्या आहेत. भूकंपानंतर लगेचच पॅसिफिक त्सुनामीचा मोठा इशाराही देण्यात आला. फक्त भूकंपच नाही तर थेट त्सुनामीचेही मोठे संकट आहे.

भूकंपानंतर त्सुनामीचे मोठे संकट, प्रशासन अलर्ट मोडवर 

पुढील तीन तासांत त्सुनामीच्या लाटा इंडोनेशिया, तैवान, फिलीपिन्स, पापुआ न्यू गिनी यांच्या किनारपट्टीवर पोहोचू शकतात. किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. भूकंपानंतर त्सुनामीचे मोठे संकट आहे. हा अत्यंत तीव्र भूकंप असल्याचे सांगितले जाते. अजूनही संकट टळले नाही.

तज्ज्ञांचा अत्यंत मोठा इशारा पुढील 3 तास अत्यंत धोक्याची 

तज्ज्ञांच्या मते, येणाऱ्या भूकंपामुळे अधिक नुकसान होऊ शकते. त्याची ऊर्जा थेट जमिनीपर्यंत पोहोचू शकते. 10 किलोमीटर दूरपर्यंत या भूकंपाचे तीव्र झटके जाणू शकतात. फिलीपींस हा प्रशांत महासागरमधील रिंग ऑफ फायद क्षेत्र आहे. सध्या प्रशासनाची परिस्थितीवर नजर आहे. लोकांना सुरक्षित राहण्याचा इशारा देण्यात येतो. परिस्थिती अधिक बिघडू शकते.

7.8 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंप मोठे नुकसान त्सुनामीचे संकट डोक्यावर 

7.8 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंप झाल्याने अनेक रस्ते, इमारतीचे मोठे नुकसान झाले. पुढील काही तास लोकांवर संकट कायम आहे. लोकांना सुरक्षितस्थळी हलवले जात आहे. सकाळी सकाळीच जोरदार भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रत्येक स्थितीवर प्रशासनाची बारीक नजर आहे. फिलीपिन्समध्ये भूकंप आणि त्सुनामी नक्की काय तांडव घालते, हे काही तासात स्पष्ट होईल. सध्या फिलीपिन्सकडे जगाच्या नजरा आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.