मोठी बातमी! ठाकरे गटाचे खासदार शिंदेंच्या संर्पकात? 'मातोश्री'वर घडामोडींना वेग, उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक
Tv9 Marathi June 13, 2026 01:45 AM

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी देखील अनेकदा बोलताना ऑपरेशन टायगरचा उल्लेख केला आहे. मध्यंतरी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संर्पकात असल्याचा दावा केला जात होता. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी खासदारांची बैठक बोलावली आहे. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. येत्या 14 जून रोजी उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी खासदारांची बैठक बोलावली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या खासदाराची बैठक बोलावल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

येत्या 14 जून रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही खासदारांची बैठक होणार आहे. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. मध्यंतरी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संर्पकात असल्याचा दावा केला जात होता. नागेश पाटील आष्टीकरांनी देखील एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, तर खासदार संजय पाटील यांच्या पत्नीच्या तब्यची विचारपूसही एकनाथ शिंदेंकडून करण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्वा प्राप्त झालं आहे.

ओमराजे निंबाळकरांची बैठकीला दांडी 

दरम्यान दुसरीकडे आज धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर गैरहजर असल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे, शिवसेना ठाकरे गटाचे सात खासदार हे शिवसेना शिंदे गटाच्या संर्पकात असल्याची चर्चा सुरू आहे, त्यातच आता ओमराजे निंबाळकर या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित नसल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला होता, तेव्हापासून महाविकास आघाडीमधील घटक पक्षांना गळती लागल्याचं पहायला मिळत आहे. ही गळती रोखण्याचं मोठं आवाहन महाविकास आघाडीपुढे असणार आहे. याचा सर्वात मोठा फटका हा आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.