Portugal vs Congo DR : ख्रिस्तियानो रोनाल्डो 'म्हातारा' झाला... सहावा वर्ल्ड कप खेळणाऱ्या सुपरस्टारसोबत नेमकं काय घडलं ते वाचा...
esakal June 18, 2026 02:45 AM

Portugal vs Congo DR Marathi Football Fifa News: किलियन एमबापे, लिओनेल मेस्सी यांच्या करिष्म्यानंतर आता सर्वांच्या नजरा ख्रिस्तियानो रोनाल्डोकडे ( Cristiano Ronaldo) वळल्या होत्या. पोर्तुगालचा हा सुपरस्टार विक्रमी सहावा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप खेळायला मैदानावर उतरला आणि तो आता 'म्हातारा' झाल्याचे स्टॅट्स समोर आले. आता ते नेमके स्टॅट्स काय आणि त्याच्या नावावर कोणता विक्रम नोंदवला गेला, हे जाणून घेऊयात.

पोर्तुगालसलग सातव्या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळत आहे आणि पोर्तुगीज संघाची सर्वोत्तम कामगिरी १९६६ मधील त्यांच्या पदार्पणाच्या सहभागात झाली होती, जेव्हा त्यांनी तिसरे स्थान पटकावले. ४० वर्षांनंतर, २००६ मध्ये जर्मनी येथे झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांनी चौथे स्थान मिळवले होते. पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो, २००६ पासून आतापर्यंत पाच वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये गोल केले आहेत आणि आता सहा वेगवेगळ्या वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये गोल करणाऱ्या पहिल्या खेळाडूचा विक्रम त्याला खुणावतोय. लिओनेल मेस्सीनंतर सहा वर्ल्ड कप खेळणारा तो दुसरा खेळाडू ठऱला, तर तो पहिला युरोपियन खेळाडू ठरला.

४१ वर्षे आणि १३२ दिवसांचा असताना, ख्रिस्तियानो रोनाल्डो वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सामना सुरू करणारा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. यापूर्वी २०१८ मध्ये इजिप्तचा गोलरक्षक इसाम एल हदारी (४५ वर्षे, १६१ दिवस) हा या विक्रमात पुढे आहे. पोर्तुगालचा संघ आज कोंगो डीआर विरुद्ध खेळतोय... या मध्य आफ्रिकन संघाने ५२ वर्षानंतर वर्ल्ड कप स्पर्धेत पुनरागमन केले आहे. मागच्यावेळेस ते १९७४ मध्ये खेळले होते. पोर्तुगालने जराही विलंब न करतान सहाव्या मिनिटाला गोलखाते उघडले. नेटोच्या पासवर जोआओ नेव्हेसने हेडरद्वारे गोल करून १-० अशी आघाडी मिळवून दिली. नेव्हेसचा हा देशासाठी चौथा गोल ठरला.

Argentina vs Algeria : १९६६ नंतर कोणालाच नाही जमले, ते लिओनेल मेस्सीने केले... १ गोल अन् ५ भन्नाट विक्रम, पेले यांचाही पराक्रम मोडला

जोआओ नेव्हेस (२१ वर्षे, २६३ दिवस) हा वर्ल्ड कप स्पर्धेत गोल करणारा तिसरा सर्वात तरुण पोर्तुगीज खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी २००६ मध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो (२१ वर्षे, १३२ दिवस) आणि २०२२ मध्ये गोन्कालो रामोस (२१ वर्षे, १६९ दिवस) यांचा क्रमांक लागतो.

The Top 10 Oldest Players in World Cup History
  • एस्साम अल-हदारी – इजिप्त विरुद्ध सौदी अरेबिया (२५ जून २०१८) – ४५ वर्षे, १६१ दिवस

  • फरिद मोंड्रागॉन – कोलंबिया विरुद्ध जपान (२४ जून २०१४) – ४३ वर्षे, ३ दिवस

  • रॉजर मिला – कॅमेरून विरुद्ध रशिया (२८ जून १९९४) – ४२ वर्षे, ३९ दिवस

  • ख्रिस्तियानो रोनाल्डो – पोर्तुगाल विरुद्ध डीआर काँगो (१७ जून २०२६) – ४१ वर्षे, १३२ दिवस

  • पॅट जेनिंग्ज – उत्तर आयर्लंड विरुद्ध ब्राझील (१२ जून १९८६) – ४१ वर्षे, ० दिवस

  • पीटर शिल्टन – इंग्लंड विरुद्ध इटली (७ जुलै १९९०) – ४० वर्षे, २९२ दिवस

  • डिनो झॉफ – इटली विरुद्ध जर्मनी (११ जुलै १९८२) – ४० वर्षे, १३३ दिवस

  • मॅन्युएल न्युअर – जर्मनी विरुद्ध कुरासाओ (१४ जून २०२६) – ४० वर्षे, ७९ दिवस

  • अली बौमनिजल – ट्युनिशिया विरुद्ध युक्रेन (२३ जून २००६) – ४० वर्षे, ७१ दिवस

  • वोजिन्हा – केप वर्दे विरुद्ध स्पेन (१५ जून २०२६) – ४० वर्षे, १२ दिवस

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.