बीडच्या केज तालुक्यातील कदमवाडी फाटा येथे तरुणाची हत्या
केज पोलीस ठाण्यात नातेवाईकांची गर्दी.
विलास घुले नामक तरूणाची कदमवाडी फाटा परिसरातील हॉटेल गावकरी येथे हत्या
काल रात्रीच्या सुमारास चाकुने भोकसुन खून करण्यात आला.
Dharashiv: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमलेधाराशिव -
ओमराजांच्या गोवर्धन वाडी येथील निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले
ओमराजेंचा शिवसेना प्रवेश निश्चित, अधिकृत घोषणा बाकी
अधिकृत घोषणा बाकी असतानाचा कार्यकर्ते निवासस्थानी
थोड्याच वेळात शिवसेनेचे आमदार माजी मंत्री तानाजी सावंत देखील ओमराजे यांच्या निवासस्थानी येणार
Raigad: पहिल्याच पावसात महाडच्या रस्त्यावर पाणी साचलेरायगड -
- पहिल्याच पावसात महाडच्या रस्त्यावर पाणी साचले
- पाईप लाईन, गटारांची काम अपूर्ण असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी
- पाणी साचलेल्या रस्त्यांवरून मार्ग काढताना नागरीक आणि वाहन चालकांना करावी लागत आहे कसरत
- महाड नगर पालिकेचे उपनगराध्य संदिप जाधव यांनी केली पाणी साचलेल्या रस्त्यांची पहाणी
- रस्ता शेजारी पडलेला मातीचा भराव काढुन गटार मोकळी करण्याचे दिले आदेश
Bhiwandi: भिवंडीत शहरात पावसाचे आगमन, पहिल्या पावसात मुलांनी घेतला भिजण्याचा आनंदभिवंडीत शहरात पावसाचे आगमन, पहिल्या पावसात मुलांनी घेतला भिजण्याचा आनंद...
भिवंडी शहरात आज अचानक झालेल्या पावसाच्या आगमनाने नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
सकाळपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी अचानक आलेल्या सरींमुळे अनेकांची तारांबळ उडाली.
तर लहान मुलांनी पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद घ्यायचे चित्र पाहायला मिळाले.
Dharashiv: ओमराजे निंबाळकर शिवसेनेमध्ये येणार, विकासाच्या दृष्टीने निर्णय घेणार - तानाजी सावंतधाराशिव -
ओमराजे निंबाळकर शिवसेनेमध्ये येणार
विकासाच्या दृष्टीने ओमराजे निंबाळकर निर्णय घेणार
ऑपरेशन टायगर ची जबाबदारी तानाजी सावंत यांच्यावर दिल्याची चर्चा
तानाजी सावंत यांनी आपल्यावर ऑपरेशन टायगर ची जबाबदारी असल्याचा दिला दुजोरा
तानाजी सावंत खासदार ओमराजे निंबाळकर यांची भेट घेणार
तानाजी सावंत यांची माहिती
कोर्टाचा निर्णय झाला आणि माझे त्यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत
ऑपरेशन टायगर च्या अनुषंगाने धाराशिवमध्ये मोठी घडामोडी
Mumbai: या अधिवेशनात १० विधेयकं मांडणार- मुख्यमंत्रीमुख्यमंत्री -
या अधिवेशनात १० विधेयकं मांडणार
महिला आणि शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणारे विधेयक असेल
विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला आम्ही तयार आहोत
Mumbai: इंधन आणि गॅसचा राज्यात सुरळीत पुरवठा - मुख्यमंत्रीमुख्यमंत्री -
इंधन आणि गॅसचा राज्यात सुरळीत पुरवठा होत आहे
पाऊस अपुरा झाल्यास पाण्याचा प्रश्न निर्माण होईल
गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्यात पाणीसाठा मर्यादीत आहे
पाऊस पडेपर्यंत पाणी राखून ठेवलं पाहिजे
पाण्याचा उपसा बंद आहे
आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी केली
Mumbai: लोकांना आवडतील असे मुद्दे विरोधकांकडे नाहीत - मुख्यमंत्रीमुख्यमंत्री -
लोकांना आवडतील असे मुद्दे विरोधकांकडे नाहीत
विरोधकांनी चॅट जीपीटी वापरून पत्र लिहिले
पत्र लिहिण्याचे कष्ट विरोधकांनी घेतले नाही
विरोधक तंत्रज्ञान वापरतात ही चांगली गोष्ट
Mumbai: कर्जमाफीबाबत बँकांना योग्य सूचना दिल्या आहेत - मुख्यमंत्रीअधिवेशनापूर्वी सरकारची पत्रकार परिषद
कर्जमाफीबाबत बँकांना योग्य सूचना दिल्या आहेत
शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्यास नियम बदलणार
सरकार कर्जमाफी करेल ही भावना शेतकऱ्यांमध्ये नसावी म्हणून नियम
कर्जमाफी करताना राजकीय कमिटी
पुण्याच्या भोर तालुक्यातील नीरा- देवघर धरणात तरुणाचा बुडून मृत्यूपुणे येथील चार तरुण वरंधा घाटात फिरण्यासाठी आले असताना निरा - देवघर धरणातील पाणी पाहून तरुण वेणूपुरी जवळून धरणात पोहण्यासाठी उतरले. त्यातील एका तरुणाला पोहता येत नसल्याने पाण्याच्या गाळात बुडून त्याचा मृत्यू झाला.
जुन्नर तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन; गुंजाळवाडी, वडगाव सहाणी आणि सावरगाव परिसराला दिलासाउकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी, वडगाव सहाणी आणि सावरगाव परिसरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
गणपतीपुळे दुर्घटना अपडेट; समुद्रात बुडून बेपत्ता असलेल्या आणखी दोघांचे मृतदेह सापडलेआदित्य राऊत आणि आनंद नरवडे यांचे मृतदेह आज दुपारनंतर सापडले
बेपत्ता असलेल्या सर्व पाचही जणांचे मृतदेह सापडले
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच जण काल सकाळी बुडाले होते गणपतीपुळे समुद्रात
प्रेम आदमाने, यश कांबळे, अनिकेत हिवराळे यांचे मृतदेह काल सापडले.
उमरगा तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आक्रमकओमराजे निंबाळकरांनी शिवसैनिक आणि जनतेच्या भावनांचा विचार करून निर्णय घ्यावा
उमरगा तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आक्रमक
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला उमरगा येथील ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचा बिनशर्त पाठिंबा
धाराशिव जिल्ह्यातील गोवर्धन वाडी येथे ओमराजे निंबाळकर पक्षांतराच्या संदर्भात कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत महत्त्वाची बैठक घेत असताना दुसरीकडे उमरग्यात कार्यकर्ते आक्रमक
पुण्यासह देशभरात आज नीट परीक्षा संपन्न, परीक्षा केंद्रावर गोंधळ नाहीण्यासह देशभरात आज नीट परीक्षा संपन्न
पुण्यातील कुठल्या ही परीक्षा केंद्रावर गोंधळ नाही
पुण्यातील सर्व नीट केंद्रावर परीक्षा सुरक्षित वातावरणात पूर्ण
पुण्यातील सर्व केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त
मे महिन्यात पेपरफुटीमुळे नीट ची परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात आली
RSSचे लोक माझ्यावर हल्ला करतील: अभिजीत दीपकेकॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे. यादरम्यान अभिजीत दीपकेनं आरएसएसवर गंभीर आरोप केला. आंदोलनात आरएसएसचे लोक शिरले असून ते हल्ला करतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
रायगडच्या महाडमध्ये जोरदार पाऊसमहाडमध्ये जोरदार पाऊस
सकाळपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणानंतर महाडमध्ये जोरदार पाऊस
तास भरापेक्षा अधिक काळ पावसाने महाडकरांना झोडपले
उकाडा आणि कडक उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा
पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवातउकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी सुखवार्ता
पुणे शहरात सगळीकडे पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी
सकाळपासून पुणे शहरात ढगाळ वातावरण
पुढील ३ दिवस पुण्यात पावसाची शक्यता
ओमराजे निंबाळकर थोडक्यात वेळात गोवर्धनवाडी येथील निवासस्थानी दाखल होणारओमराजे यांच्या गोवर्धनवाडीतील घरी बैठकीची जय्यत तयारी पुर्ण
शिवसैनिक कार्यकर्ते जमायला झाली सुरूवात,ओमराजेंचे पोस्टर हातात घेवुन कार्यकर्ते दाखल
ओमराजे साधणार पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद
ओमराजे नेमक काय राजकीय निर्णय घेणार याकडे लागले सर्वांचे लक्ष
ओमराजे निंबाळकर ठारकेंची साथ देणार की एकनाथ शिंदेकडे जाणार याबाबत धाराशिवसह महाराष्ट्राला उत्सुकता
गडचिरोलीत 5 परीक्षा केंद्रांवर नीट-यूजीची फेरपरीक्षा सुरूपेपरफुटीच्या वादामुळे रद्द झालेल्या नीट-यूजी 2026 परीक्षेची फेरपरीक्षा आज गडचिरोलीत शांततेत आणि कडेकोट बंदोबस्तात पार पडत आहे. शहरातील 5 परीक्षा केंद्रांवर तब्बल 1522 विद्यार्थी आपल्या भवितव्याची परीक्षा देत आहेत. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी अर्थात NTA च्या वतीने दुपारी 2 ते सायंकाळी 5.30 या वेळेत परीक्षा घेण्यात येत आहे. शिवाजी हायस्कूल, कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, शिवाजी महाविद्यालय, शासकीय विज्ञान महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन आणि महिला महाविद्यालय हे परीक्षा केंद्र असून परिसरातील केंद्रांवर विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळाली.
ओमराजे निंबाळकर यांचे बार्शीमध्ये स्वागतओमराजे निंबाळकर यांचे बार्शी मध्ये स्वागत करण्यात आले. धाराशिव लोकसभा मतदारसंघात बार्शीत आले असून तेथील लोकांनी त्यांचे स्वागत केले. निकालविरोधात लागल्याने हे कुटुंबासाठी दुःखदायक असून न्याय कुठे मागायचा असं ओमराजे निंबाळकर म्हणालेत. शिंदे गटात जाण्याविषयी ते म्हणाले की, मी सर्वसामान्य लोकांसोबत राहणार आहे.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार - भास्कर जाधवराज्यात कमिशनखोरी वाढली आहे असं भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
रायगडमध्ये 30 जूनपर्यंत स्विमिंग पूल बंदरायगड जिल्ह्यातील स्विमिंग पूल 30 जून पर्यंत बंद ठेवण्यासंबंधी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी केले आहेत. मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब आणि धरणांतील घटता जलसाठा या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Pune: पुण्यात पावसाला सुरुवातपुणेकरांना तात्पुरता दिलासा! पुणे शहरात पावसाचा शिडकावा
उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी सुखवार्ता
पुणे शहरातील मध्यवर्ती भागात पावसाच्या हलक्या सरी
उद्यापासून पुण्यात जोरदार पावसाची शक्यता
भरत गोगावले पालक मंत्री होणार यात शंका नाही - आमदार महेंद्र थोरवेशिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगडच्या पालक मंत्री पदाबाबत महत्त्वपूर्ण विधान केल आहे. विधान परिषद निवडणुकीत वरीष्ठांचा निर्णय अंतिम मानून आम्ही पाठींबा दिला. या वरून माझ्यावर टिका झाली. वरिष्ठांच्या आदेशाच पालन करण हे शिवसैनिक म्हणून आमच कर्तव्य आहे.
गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयीगडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयी
काँग्रेस उमेदवार विनोद भांडेकर यांचा पराभव तर अपक्ष उमेदवार बावणे यांना फक्त 98 मते
माजी सभापती मुक्तेश्वर काटवे यांच्या निधनानंतर प्रभाग 9 मध्ये लागली पोट निवडणूक
अकोला जिल्ह्यातील पातुर नगरपालिकेवर काँग्रेस- शिवसेना उबाठा आघाडीचे वर्चस्वपातूरच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचे हिदायत खान रूम खान उर्फ इद्दू पैलवान विजयी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास योद्धा पॅनलचे सय्यद बुऱ्हाण नबी यांचा केला 1601 मतांनी पराभव. इद्दू पैलवान यांना 6009 मते. तर राष्ट्रवादी, वंचित आणि एमआयएम आघाडीचे बुऱ्हान नबी यांना 4408 मते. भाजपचे सचिन ढोणे तिसऱ्या क्रमांकावर. तर शिंदे सेनेच्या सुभाष बोचरे यांना फक्त 194 मते.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या गोवर्धनवाडी येथील निवासस्थानी जय्यत तयारी सुरूओमराजे निंबाळकर दोन तासात आपल्या गावात होणार दाखल
गावातील शिवसैनिक,पदाधिकारी गावकऱ्यांशी संवाद साधणार
दुपारी ४ वाजता ओमराजेंच्या बैठकीला होणार सुरूवात
ओमराजे ठाकरेंची साथ सोडुन शिंदेंकडे जाणार? याकडे लागले लक्ष
केडीएमसी क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंग्जधारकांवर आता मोठी कारवाई होणारकल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ४५० ते ५०० अनधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आल्याचा आरोप भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी यापूर्वी केला होता. या अनधिकृत होर्डिंग्जमुळे महापालिकेचा जवळपास १० कोटी रुपयांचा महसूल बुडत असल्याचा दावा देखील त्यांनी केला होता.
मनमाड पोट निवडणुकीत शिवसेना विजयी, समर्थकांचा जल्लोषमनमाड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दहाच्या दोन जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले.प्रभाग क्रमांक दहा 'अ ' मधून माजी नगराध्यक्ष राभभाऊ पगारे यांनी 1555 मते मिळवित शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ज्योती वाघमारे यांचा 485 मतांनी पराभव केला तर दुसऱ्या सर्वसाधारण गटात शिवसेना शिंदे गटाच्या अलका अशोक रसाळ यांनी 1216 मते मिळवत ठाकरे गटाच्या शिफा जावेद शेख यांचा 440 मतांनी पराभव केला.विजयानंतर पगारे व रसाळ समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला.
अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजयअकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय. नगरसेवकांच्या 2 पोटनिवडणूक जागांवर भाजपने विजयी मिळवला. भाजपचे उमेश हरसुलकर यांनी 1401 मते मिळवत शिंदेशिवसेनेच्या रेश्मा चंदन यांचा पराभव केला.
भाजपच्या शारदा योगेश नाठे यांनी देखील 1706 मते मिळवत दणदणीत विजय मिळविला. त्यांनी भारती प्रशांत नाठे यांचा 778 मते पराभव केला. दरम्यान, आता अकोट नगरपालिकामध्ये भाजपचा पक्षीय बलाबल संकेत 2 जागांहून वाढ झालीय. आता 11 जागाहून थेट 13 नगरसेवक भाजपचे या ठिकाणी असणार आहे.
खासदार संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीलाठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीला दाखल झाले असून खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.
नांदेड जिल्ह्यात साडेचौदा हजार विद्यार्थी आज नीटची परीक्षा देणारनीट फेरप्रवेश परीक्षेसाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. नांदेड जिल्ह्यातील 42 परीक्षा केंद्रांवर सुमारे साडेचौदा हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.परीक्षा सुरळीत आणि गैरप्रकार मुक्त वातावरणात पार पाडावी यासाठी प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सकाळी 11 ते दुपारी दीड या कालावधीत तपासणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दुपारी दोन ते सव्वा पाच या वेळेत परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक तालुक्यात एका नायब तहसीलदारांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सामुहिक योगासनांचा सरावऐतिहासिक बिबी का मकबरा मध्ये योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासोबत विविध संस्थांनीही जिल्ह्यात ठीक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यात आबालवृद्धांनी सहभाग घेऊन योग सराव केला. बीबी का मकबरा येथे आयोजीत मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण उपस्थितांना दाखवण्यात आले. त्यानंतर सामूहिक योगासने, प्राणायाम आदींचा सराव करण्यात आला. यात शासकीय अधिकारी- कर्मचारी, विद्यार्थी, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते.
नीट पुनर्परीक्षा पार्श्वभूमीवर परभणीत परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनातनीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा प्रशासनाने कडेकोट तयारी केली आहे. जिल्ह्यातील एकूण १४ परीक्षा केंद्रांवर आज ४ हजार ७५१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. पेपरफुटीच्या घटनेनंतर परीक्षेच्या सुरक्षेला विशेष महत्त्व देण्यात आले असून प्रश्नपत्रिका कडेकोट पोलीस बंदोबस्तात परीक्षा केंद्रांवर पोहोचविण्यात आल्या. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे 14 केंद्रावर १०४ पोलीस बंदोबस्त ३५ आर्मी जवान तैनात आहेतकरण्यात आला आहे तर प्रश्नपत्रिकेच्या बॉक्स जवळ आर्मीचे जवान तैनात करण्यात आले आहे प्रशासनाकडून पूर्ण खबरदारी घेत चौक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तर परीक्षा केंद्रावर योग्य ती व्यवस्था करण्यात आलेली आहे
पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी केलेल्या रोपांना पाणी शिंपण्याची वेळतळकोकणातील शेतकरी वरुणराजाची आतुरतेने वाट बघतोय. मात्र वरूनराजाने मागील 15 दिवस दडी मारली आहे. शेतात पेरलेल्या भाताची रोपे वाचवण्यासाठी तळकोकणातील शेतकऱ्याने शक्कल लढविलीय. पाऊसच नसल्याने विहीरच पाणी सिंचन करुन आपलं शेत वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर तळकोकणात पेरणी केली जाते. सुरूवातीला दोन ते तीन दिवस काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली त्यामुळे काही शेतकऱ्यांनी पेरणी केली मात्र त्यानंतर पावसाने दांडी मारल्याने विहिरीतून पाणी शिंपण्याची वेळ बळीराजावर आलीय. तळकोकणातील काही भागात तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची देखील वेळ येण्याची शक्यता आहे.
अकोला-वाशिम इंटरसिटी रेल्वेच्या डब्यातून खाली पडून एकाचा दुर्दैवी मृत्यूवाशीमच्या मंगरूळपीर तालुक्यातील सावरगाव कान्होबा येथील कुंडलिक लक्ष्मण सावंत हे घरकुलाच्या कामानिमित्त मुंबईहून गावी येत होते.
परभणीच्या मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिर येथील झालेल्या घटनेची होणार चौकशीपरभणीच्या मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिर येथे काल झालेल्या दुर्दैवी घटनेत 23 भाविक जखमी झाले तर पाच भाविक मृत्यू पावले आहेत काल रात्री उशिरा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी या ठिकाणी येऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे तर आज प्रांत अधिकारी खाली चौकशी करणार आहे.
योग दिनानिमित्त शिवाजीराव आढळराव पाटील यांचा फिटनेस मंत्र; वयालाही मागे टाकणारी तंदुरुस्तीआंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथील रस्ते शेतशिवार आणि डोंगर पठाराव मोकळ्या वातावरणात नियमित व्यायाम, योगा आणि शिस्तबद्ध जीवनशैलीच्या माध्यमातून त्यांनी निरोगी राहण्याचा संदेश दिला आहे.सकाळच्या आल्हाददायक वातावरणात वॉक, वॉर्म-अप आणि जिममधील कसून व्यायाम करताना आढळराव पाटील दिसत आहेत. वयाच्या या टप्प्यावरही त्यांनी जपलेली तंदुरुस्ती युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, नियमित व्यायाम हाच निरोगी आयुष्याचा मंत्र असल्याचे ते कृतीतून दाखवून देत आहेत.
शिंदेसेनेच्या युवासेनेकडून ओमराजे यांना संरक्षण, मध्यरात्री कार्यकर्ते थेट ओमराजे यांच्या घराबाहेरखासदार ओमराजे निंबाळकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भेटायला आल्यानंतर तात्काळ एकनाथ शिंदेंच्या युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा ओमराजे यांच्या घराबाहेर जमले होते. विश्वगुरु माध्यमांसमोर अपशब्द वापरतात आणि मध्यरात्री या लोकांना भेटायची वेळ का आली? वेळ पडली तर आम्ही ओमराजे यांच्यासोबत धाराशिव ला जाऊ अशी भूमिका युवासेनेचे सचिव किरण साळी यांनी व्यक्त केली.
Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणारपवनराजे हत्याकांड निकाल लागल्यानंतर आज पहिल्यांदा ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार
खासदार फुटी नंतर आज ओमराजे दुपारी ४ वाजता धाराशिव मध्ये कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेणार
काल रात्री उशिरा आमदार वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील यांनी भेट घेत मनधरणी केल्याची चर्चा
ओमराजे निंबाळकर यांचं मन वळवण्याचा प्रयत्न
आज दुपारी बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांच्याशी बोलून ओमराजे निंबाळकर आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार..
यशवाडी येथील झालेल्या दुर्देवी घटनेनंतर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घटनास्थळी येत केली पाहणीपरभणीच्या मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिराच्या सभा मंडप कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मुंबईवरून येत उशिरा रात्री घटनास्थळी पाहणी केली आहे . घटनेमध्ये झालेल्या सर्व जखमींना पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी हॉस्पिटलमध्ये जात भेट दिली आहे व त्यांना धीर देण्यात आला आहे त्यांनी वेळी बोलताना सांगितले आहे की झालेली घटनाही दुर्दैवी आहे मंदिराची कामे संत गतीने सुरू आहे हे काम लवकर पूर्ण व्हायला पाहिजे होतं घटनेत मृत्यू पावल्या भक्तांच्या कुटुंबियांना पाच लाखाची मदत राज्य सरकारकडून करण्यात आली आहे तर परभणीत यानंतर कोणतीही अशी घटना घडणार नाही याची काळजी घेतली जाणार असे पालकमंत्री यांनी सांगितले