महाराष्ट्रातील या गावात होते दुर्योधनाची पूजा
Marathi June 27, 2026 05:25 AM
Duryodhana Temple

दुर्योधन म्हटलं की आठवते महाभारत आणि दुर्योधनाच्या सांगण्यावरून दु:शासनाने केलेले द्रौपदी वस्त्रहरण ! महाभारतातील सर्वात मोठ्या खलनायकाबद्दल सर्वांना माहिती आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रात दुर्योधनाचं मंदिर सुद्धा आहे, अनेकजण तेथे जातात.  देशात दुर्योधनाची काही ठिकाणी मंदिरे आहेत पण महाराष्ट्रातील एकमेव मंदिर अहमदमगर जिल्ह्यात आहे.

गावाचे ग्रामदैवत दुर्योधन

अहमदमनगरमधील कर्जत तालुक्यातील दुरगाव या गावात हे मंदिर आहे. ग्रामस्थांना दुर्योधन मंदिराचा सार्थ अभिमान आहे. या मंदिरात नियमितपणे उत्सवही केले जातात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गावाचे ग्रामदैवत दुर्योधन आहे. हे मंदिर 15 व्या शतकातील आहे अशी माहिती आढळते.

हेही वाचा – या मंदिरांतील प्रसाद घरी नेण्यास आहे सक्त मनाई !

बांधकामाविषयी अनेक कथा प्रचलित

महाभारतानुसार कौरव पांडवांच युद्ध झाल्यानंतर जखमी दुर्योधन पांडवांना शरण न जाता दंडकारण्यात गेला, असं सांगण्यात आलंय. हे दंडकारण्य नगर जिल्ह्यापर्यंत पसरलेले आहे. कौरवांनी अज्ज्ञातवासात पाठवल्यानंतर पांडव काही काळ दुरगाव येथे आले होते, अशी आख्यायिका आहे.

तीन वर्षांनी उत्सव

मंदिरात महादेवांच्या दोन पिंडी आहेत. येथे दर तीन वर्षांनी या मंदिरात ग्रामस्थांतर्फे मोठा उत्सव साजरा केला जातो. तसेच अधिक महिन्यात आठ दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.

गावाच्या नावाची कथा

दुर्गाव ते दुरगाव असे गावाचे मान दुर्योधनामुळेच गावाला पडले असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – देशातील ऐतिहासिक सूर्य मंदिरे; वास्तुकलेचा अद्वितीय नमुना !

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.