AUSW vs INDW : टीम इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह सेमी फायनलमध्ये
GH News June 29, 2026 01:11 AM

ऑस्ट्रेलिया वुमन्स क्रिकेट टीमने ऐतिहासिक असा विजय मिळवत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वातील उपांत्य फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियाने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौर हीने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियासमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 1 ओव्हरआधी 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने 19 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 172 रन्स धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने यासह वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. ऑस्ट्रेलियाचा हा सलग आणि एकूण पाचवा विजय ठरला. ऑस्ट्रेलियाने यासह सेमी फायनलचं तिकीट मिळवलं. तर पराभवामुळे भारतातं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. तर ए ग्रुपमधून भारताच्या पराभवासह दक्षिण आफ्रिकेने सेमी फायनलचं तिकीट मिळवलं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.