गंगापूर : घरातील संकटे दूर आणि पतीचे दुसऱ्या महिलेची संबंध असल्याचे खोटे भीती घालून एका भोंदू बाबा ने विवाहितेचे पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी अवघ्या वीस दिवसात दोन आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली आहे.
याविषयी सोनाली तागड (वय २६) रा. पाथर्डी जि. अहिल्यानगर,ह.मु. भेंडाळा फाटा ता.गंगापूर या महिलेची व्हाट्सअप ग्रुप द्वारे ओळखून कमलाकर जोशी (वय ५०) रा. गाणगापूर (कर्नाटक) यांनी व त्याच्या साथीदारांनी सदरील महिलेस वेगवेगळे भीती घालून तिच्याकडून रोख , फोन पे द्वारे व सोन्या चांदीचे दागिने असे एकूण पाच लाख रुपयाचा तिला गंडा घातला होता. या विषयाचे दैनिक सकाळमध्ये ७ जून रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते.
या विवाहितेने 6 जून रोजी दिलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस वेगवेगळे पतके करून या भोंदू बाबाच्या तपास कामी सक्रिय झाले होते. या फसवणुकीतील बादल गणेश एखंडे (वय २६) रा. वाकोद ता. जामनेर जि. जळगाव ह्याला छत्रपती संभाजीनगर येथून बाबा पेट्रोल पंपा जवळून पकडले. तर दुसरा आरोपी सागर सूर्यभान गंगावणे (वय २७) रा. अष्टविनायक नगर नवीन मोंढा जालना याला जालन्यातून अटक केली आहे. या दोन्ही आरोपींना रविवार (ता.२८) रोजी ताब्यात घेऊन अटक केली आहे. या दोन्ही आरोपीकडून दहा हजार रुपयांचे रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.
गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड व तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल झांजुर्णे यांनी सांगितले की यातील मुख्य आरोपी कमलाकर जोशी हा अत्यापही फरार असून ही फार मोठी टोळे आहे. अशा स्वरूपाची अंधश्रद्धेची भीती घालून त्यांनी अनेकांना गंडा घातला आहे. या दोघा आरोपींना सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल झांजुर्णे, जमादार गणेश जाधव, अजितसिंग नागलोत यांनी सापळा रचून या दोन्ही आरोपींना अटक केली आहे.